Dadar Police News
Dadar Police NewsSaamtv

Cyber Fraud News: सायबर चोरट्यांचा प्रताप! देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; प्रकरण काय?

Dadar Police News: महालक्ष्मी, तुळजाभवानी, सिद्धिविनायक, त्र्यंबकेश्वर या देवांच्या नावाखाली ही फसवणूक सुरू होती.
Published on

सचिन गाड, प्रतिनिधी...

Cyber Fraud: देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा दादर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रत्यक्ष जाऊन देवाचे दर्शन घेणे, पूजा करणे शक्य होत नाही अशा भाविकांना ऑनलाइन दर्शन आणि पूजेचे आमिष दाखवून या टोळीकडून पैसे उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात पश्चिम बंगालमधून एकाला अटक केली आहे.

Dadar Police News
Ramdas Athawale On Ajit Pawar: आमचे मंत्रिपद अजितदादांनी पळवले; रामदास आठवलेंनी करून दिली आठवण

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्याच्या या सायबर युगात गुन्हेगारी देखील सायबर होत चालली आहे. सायबर चोरटे कोणाच्या नावाने फसवणूक करतील याचा काही नेम नाही. आता तर त्यांनी चक्क देवांच्या नावे फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शनाचे पूजेचे तसेच प्रसादाचे आमिष दाखवून दक्षिणेच्या नावाखाली त्यांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीचा दादर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

महालक्ष्मी, तुळजाभवानी, सिद्धिविनायक, त्र्यंबकेश्वर या देवांच्या नावाखाली ही फसवणूक सुरू होती. यासाठी उत्सव ॲप तयार करण्यात आले होते, ज्यामधून भाविकांना ऑनलाईन दर्शन, प्रसाद तसेच पूजेचे आमिष भाविकांना दाखवले जात होते.

Dadar Police News
Sambhajinagar Adarsh Scam : मी तोंड उघडलं तर तुमची पळता भुई थोडी होईल, 'आदर्श' प्रकरणाच्या तपास यंत्रणेस इम्तियाज जलील यांचा इशारा (पाहा व्हिडिओ)

दर्शन पूजा तसेच प्रसादासाठी ७०१ रुपयांपासून ते २१००० रुपये या भामट्यांकडून उळकले जात होते. या संदर्भात तक्रार मिळताच दादर पोलिसांनी आपले पथक पश्चिम बंगालला पाठवत या टोळीतील एकाला अटक केली आहे. तसेच सुब्रजित बसू, प्राजक्ता सामाता आणि अनिता डे नावाचे साथीदार अद्याप फरार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com