Girish Mahajan: आमची खुर्ची फक्त काढू नका, शिवसेनेचं एवढंच धोरण, गिरीश महाजनांचा टोमणा

शिवसेना (Shivsena) नवाब मलिक (Nawab Malik) जिंदाबाद म्हणत आहेत. इतके वाईट दिवस शिवसेनेचे कधीही आलेली नाही.
Girish Mahajan
Girish Mahajan Saam TV

सुशांत सावंत -

मुंबई: इतका निर्लज्जपणा मी कधीच पहिला नाही. नवाब मलिकांची खाती काढता मग राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीला केला आहे. तसेच, मग काम जेलमधूनच करा की, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. ते जेलमध्ये राहिले, तरी आम्ही त्यांना राजीनामा द्यायला लावणार नाही अशी यांची भूमिका आहे, असंही ते म्हणाले (BJP leader Girish Mahajan slams Shivsena over Nawab Malik case).

Girish Mahajan
Sanjay Raut : राज्यपाल भाजप लोकशाहीचा खून करतायंत, आमचं हिंदुत्व हे आगीसारख - संजय राऊत

इतके वाईट दिवस शिवसेनेचे कधीही आलेली नाही - महाजन

शिवसेना (Shivsena) नवाब मलिक (Nawab Malik) जिंदाबाद म्हणत आहेत. इतके वाईट दिवस शिवसेनेचे कधीही आलेली नाही. आमची फक्त खुर्ची काढू नका, एवढं धोरण शिवसेनेचे आहे, असं म्हणत गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) शिवसेनेवर जोरदार टीका केलीये. तसेत, राज्यभरात शिवसेनेने फिरावं आणि लोक काय म्हणतात ते ऐकावं, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिलाय.

आज राज्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात विदारक परिस्थिती आहे. सभागृह बंद पाडले तरी काहीच यांना देणे घेणे नाही, असा आरोपही त्यांनी केलाय.

हे भाई लोकांचे राज्य आहे - गिरीश महाजन

पोलिसांना गल्लीतल्या दादाकडे पैसे काढून घेण्यासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत. हे भाई लोकांचे राज्य आहे. आता पोलिसांना भाई लोकांचे पाय धरावे लागत आहेत. जसा राजा तशी प्रजा. आता बदल्यांचे लिलाव सुरु आहेत. अधिकारी जेलमध्ये आहेत, असं महाजन नितीन नांदगांवकर (Nitin Nandgaonkar) प्रकरणावर बोलले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com