Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Narayan RaneSaam Tv

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Narayan Rane Health Update: भाजप नेते नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

Summary -

  • भाजप नेते नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल.

  • डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

  • उद्या होणार तातडीची शस्त्रक्रिया.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुरूवारी म्हणजे उद्या तातडीने शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया केली जाणार आहे याची माहिती समजू शकली नाही.

नारायण राणे यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते आज जसलोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त कळताच त्यांचे कार्यकर्ते चिंतेत आले आहेत. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी अशी आशा ते व्यक्त करत आहेत.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Maharashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी कारवाई; नगराध्यक्षांसह ६ नगरसेवक निलंबित

नारायण राणे भाजपचे नेते आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसचे नेते होते. त्याआधी ते कट्टर शिवसैनिक होते. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये आल्यानंतर ते केंद्रीय मंत्री देखील झाले. नारायण राणे यांना नितेश आणि निलेश ही दोन मुलं असून ते दोघेही राजकारणात सक्रीय आहेत. नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही आमदार आहेत. तर नितेश राणे हे राज्याचे मंत्री देखील आहेत.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com