Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

Konkan Politics: कोकणात भाजपला मोठं यश मिळाले आहे. एक बडा नेत्या उद्या पक्ष प्रवेश करून घेत भाजप कोकणात आपली ताकद वाढणार आहे.
Maharashtra Politics
Ex-MNS leader Vaibhav Khedekar to join BJP in a grand event with supporters in Konkan.Saam tv
Published On
Summary
  • कोकणातील बडे नेते वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार.

  • रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार.

  • खेडेकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल होतील.

मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर आता कमळ हाती घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माहितीनुसार खेडेकर हे उद्या गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. खेडेकर यांच्यासोबत त्यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होतील. वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढेल असं सांगितलं जात आहे.

Maharashtra Politics
OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

वैभव खेडेकर कोकणातील मनसेचे महत्वाचे नेते होते. खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मनसेच्या स्थापनेपासून खेडेकर हे राज ठाकरेंच्या सोबत होते. मात्र गेल्या काही काळापासून ते नाराज होते. त्यानंतर काही कारणामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं. त्यानंतर ते भाजपमध्ये किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिलीय.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी कारवाई; नगराध्यक्षांसह ६ नगरसेवक निलंबित

भाजप प्रवेशाबाबत वैभव खेडेकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी ताकद देणार आहे. राज ठाकरेंसाठी माझ्या हृदयातला कोपरा आजही ओला आहे. राज ठाकरेंनी हृदयातून मला बाजूला केलं. मला माझ्या सर्व समर्थकांची मला साथ आहे. यापुढे भाजपचे काम पूर्ण ताकदीने करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडतर्फ तिन्ही जिल्हाप्रमुख यांच्यासह सर्व समर्थक सोबत आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला कोणतही राजकीय बळ नाही, कार्यकर्त्यांचं प्रेमामुळेच माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com