Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येण्याने फरक पडणार नाही- नारायण राणे|VIDEO

Raj-Uddhav Alliance Won’t Impact Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे यावरच भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी: राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत या एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की महाराष्ट्रासाठी आमच्यातले वाद हे क्षुल्लक आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी अवघ्या काही तासातच आपल्या भाषणात दुजोरा दिला होता. यानंतर अनेकववेळा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील सकारात्मक दिसत आहे.

मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही कार्यकर्ते देखील ही युती ह्वावी म्हणून ठिकठिकाणी बॅनरबाजी करत आहे. यावरच राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहे. यावरच भाजप नेते नारायण राणे म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही जो भाजपसोबत येईल तोच जिंकेल आणि भाजप एकटीजरी लढली तरी भाजप जिंकेल असा दावा नारायण राणे यांनी केला. ते रत्नागिरी येथे बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com