Uddhav Thackeray : देशात भाजप राहणार नाही, पण...; भारत-पाकिस्तान तणावावर उद्धव ठाकरे काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Uddhav Thackeray Latest News : भारत-पाकिस्तान तणावावर उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं. यावेळी ठाकरेंनी भाजपवरही निशाणा साधला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
Published On

'काश्मीर हे काल पण आपलं होतं. आज पण आपलं आहे. देशात एकवेळ भाजप राहणार नाही पण काश्मीर राहील, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत भारत आणि पाकिस्तान तणावावर भाष्य केलं. याचवेळी, देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असू, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या शिवसेनाभवनात पक्षाचे आमदार, खासदार, नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत उद्धव ठाकरेंनी देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : शरद पवार- बाळासाहेब ठाकरेंनी टाळली नरेंद्र मोदींची अटक? राऊतांचा पुस्तकातून गौप्यस्फोट, वाचा

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील शिवसेना भवनात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. 'देशात भाजप नसेल पण काश्मीर आपलं राहील, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. वैचारिक विरोध राहील. देशावर संकट आल्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहू, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

Uddhav Thackeray
Shoking News : भयंकर! आधी 400000 रुपये लुबाडले, मग पेट्रोल टाकून शिक्षकाला जिवंत जाळले

'आम्ही देशाच्या विरोधात नाही,तर सरकारच्या विरोधात आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी प्रचारदौऱ्यात उतरू नये,कारण...

उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक देश एक निवडणूक या धोरणावर भाष्य केलं. याच धोरणाचा अभ्यास करणारी समिती महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, 'देशातील निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत. निवडणुका होतात, त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी निवडणुकीच्या प्रचारात उतरू नये, अशी भूमिका ठाकरेंनी मांडली.

Uddhav Thackeray
Police Officers Transfers : राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे बदली? वाचा एका क्लिकवर

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी तयारीला लागवे, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com