Maharashtra Politics : शरद पवार- बाळासाहेब ठाकरेंनी टाळली नरेंद्र मोदींची अटक? राऊतांचा पुस्तकातून गौप्यस्फोट, वाचा

Sanjay Raut News : शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोदी- शाहांची अटक टाळली ? असा दावा संजय राऊतांनी केलाय. मोदी-शाहांना कोणत्या प्रकरणात अटक होणार होती? ती अटक पवार आणि ठाकरेंनी कशी टाळली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..
sanjay Raut News
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

कथित गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत 100 दिवस तुरुंगात होते... तर याच अनुभवावर आधारित संजय राऊतांनी पुस्तक लिहीलंय... मात्र हे पुस्तक प्रकाशनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.. त्याला कारण ठरलंय... राऊतांनी थेट मोदी आणि शाहांची अटक पवार आणि ठाकरेंमुळे टळल्याचा केलेला दावा.... संजय राऊतांनी या पुस्तकात नेमकं काय दावे केलेत? पाहूयात...

राऊतांचा गौप्यस्फोट

गोध्रा हत्याकांडावेळी केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष

सीबीआय चौकशीनंतर शाहांसह अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं

त्यावेळी मोदींवर अटकेची टांगती तलवार होती

राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नसल्याचं पवारांचं मत

पवारांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मूकसंमती, त्यामुळं मोदींची अटक टळली

मोदींच्या राजीनाम्यासाठी देशभरातून दबाव, मात्र बाळासाहेब ठाकरे मोदींच्या पाठीशी राहिले

sanjay Raut News
Shoking News : भयंकर! आधी 400000 रुपये लुबाडले, मग पेट्रोल टाकून शिक्षकाला जिवंत जाळले

भाजपनं उपकाराची जाणीव न ठेवता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष फोडल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संजय राऊतांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तो म्हणजे सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांना अटक केली होती. त्यावेळी अमित शहा यांना कोणीच ओळखत नव्हतं. मात्र मोदींनी शरद पवारांना फोन केला आणि त्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्याच्या मदतीनं अमित शहा यांना जामीन मिळवून दिल्याचंही राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात म्हटलंय. तर भाजपनं बाल साहित्य म्हणत राऊतांच्या पुस्तकाची खिल्ली उडवलीय.

sanjay Raut News
Maharashtra Politics :...तर त्यांची व्यवस्था करू; भाजप खासदार मेधा कुलकर्णींना धमकी? राजकीय वर्तुळात खळबळ

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत हे 100 पेक्षा जास्त दिवस तुरुंगात होते.. तेच अनुभव संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात मांडले आहेत. मात्र या पुस्तकातून राऊतांनी फोडाफोडीच्या राजकारणावर प्रहार केलाय. आता या पुस्तकात आणखी कोणते दावे करण्यात आलेत आणि भाजपवर कसे प्रहार केलेत? ते पुस्तक प्रकाशनानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com