Vasai-Virar MNS News: वसई-विरारमध्ये मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी ठाकरे गटात करणार प्रवेश

Vasai-Virar Political News: वसई विरारमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
uddhav thackeray and raj thackeray
uddhav thackeray and raj thackeray saam tv

निवृत्ती बाबर

Mumbai News : राज्याच्या राजकारणात अनेक अदलाबदली गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील नेते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत असताना वसई विरारमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

वसई - विरार महानगर, भोईसर विधानसभा क्षेत्रातील मनसे आणि इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षात प्रवेश करणार आहेत. आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. (Latest Marathi News)

uddhav thackeray and raj thackeray
Vikas Tingre News: काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरेंनी संपवलं आयुष्य; नेमकं कारण काय?

2019 च्या भोईसर विधानसभेचे मनसेचे उमेदवार दिनकर वाढाण होते. ते देखील आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश मुंबईत होणार आहे. दिनकर वाढाण हे भोईसर आणि वसई भागात समाजकार्यामध्ये देखील सक्रिय आहेत. (Political news)

uddhav thackeray and raj thackeray
Pune Crime News: ज्येष्ठ नागरिकाची औषधांच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; पश्चिम बंगालमधून आरोपीला बेड्या

ठाकरे गटात प्रवेश करणारे मनसे आणि इतर पक्षातील कार्यकर्ते

  • प्रकाश गावडे (वसई-विरार महानगर जिल्हा अध्यक्ष)

  • प्रविण गावडे (संपर्क प्रमुख)

  • निलेश ध्यानी (युवा उपजिल्हा अध्यक्ष )

  • विवेक विश्वकर्मा ( तालुका अध्यक्ष)

  • शैलेंद्र सिंग (उप तालुका अध्यक्ष)

  • अश्विन नायर (शहर अध्यक्ष )

  • मुकेश ठाकूर - (शहर उपाध्यक्ष)

  • राजेश दुबे (वार्ड उपाध्यक्ष)

  • जगत सिंग (वार्ड अध्यक्ष )

  • विकास तिवारी (सचिव)

  • पुरण सिंग (उपसचिव)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com