पुणे शहरात पाणी कपात करण्यात आली आहे
पुण्यात १५ जूनपासून दिवसाआड पाणी येणार
पुणे महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपात करण्यात आली
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. अखेर पुणे महानगर पालिकेकडून शहरामध्ये पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. १५ जूनपासून पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
पुणे शहरामध्ये येत्या सोमवारपासून म्हणजेच १५ जूनपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेकडून पुणेकरांना पाण्याची बचत करण्याची आणि जपून वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ जूनपासून पुणेकरांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा जपून वापर करावा असे आवाहन केले जात आहे.
या काळामध्ये पुणे शहरातील खासगी स्विमिंग पूलचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय देखील पालिकेकडून घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे बांधकामांना देखील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिका प्रशासनाकडून मसुदा तयार करण्यात आला आहे. पाणी कपातीदरम्यान जर कुणी पाण्याचा अतिवापर करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला पण अद्याप तो संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय झाला नाही. १५ जूननंतर संपूर्ण राज्यात पाऊस जोर धरेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. धरणातील पाणी पातळी कमी होत चालल्यामुळे अखेर पालिकेने पाणी कपातीबाबत निर्णय घेतला. आता सोमवारपासून पुण्यात दिवसाआड पाणी येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.