पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा भीषण वाहतूककोंडी झाली आहे. रुग्णवाहिका, मालवाहू वाहने आणि हजारो कामगार तासन्तास अडकून पडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चाकण परिसरात ५ किलोमीटरहून अधिक वाहनांच्या रांगा लागल्याची स्थिती निर्माण झाली.
चाकण एमआयडीसी आणि पुणे-नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहनभारामुळे रविवारी वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला. महामार्गावर सर्व प्रकारची वाहने संथ गतीने सरकत असल्याने अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या. रुग्णवाहिकांनाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली, तर शिफ्ट बदलाच्या वेळेत हजारो कामगार वाहतूककोंडीत अडकले. चाकण परिसरातील ही नित्याचीच समस्या बनली असून वाहतूककोंडीमुळे उद्योग क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.