भिवंडीत राडा, महापौरपदाचा तिढा; आकड्यांमुळे ब्रेक की राजकीय चेकमेट?

bhiwandi Political News : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला असतानाही भिवंडीचा महापौर ठरलेला नाही. त्यामुळे भिवंडीच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडलेल्या निवडणुकीची चर्चा होत आहे.
bhiwandi news
bhiwandi Political NewsSaam tv
Published On

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला.. त्याला महिना लोटलाय... 29 पैकी भिवंडी निजामपूर वगळता राज्यातील सर्वच महापालिकांच्या महापौरपदाची निवड झालीय... मात्र भिवंडीतलं कोडं काही सुटायला तयार नाही.... कारण सत्तेची सुत्रं कोणार्क आघाडीकडे गेल्यानंच महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडत असल्याची चर्चा आहे... भिवंडीत कोणत्या पक्षाने किती जागा मिळवल्यात पाहूयात...

भिवंडी निजामपूर महापालिकेत 90 नगरसेवक आहेत.. त्यापैकी 46 हा बहुमताचा आकडा आहे... मात्र भाजपचे 22, शिंदेसेना 12, अपक्ष 5 नगरसेवक आहेत.... दुसरीकडे काँग्रेसचे 30, पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक आहेत....तर समाजवादी पक्षाचे 6, ठाकरेसेना 2 आणि कोणार्क आघाडीचे 5 नगरसेवक आहेत..

bhiwandi news
अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? 'तो' अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार, VIDEO

खरंतर गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि कोणार्क आघाडीनं सत्ता स्थापन केली होती.. मात्र त्यानंतर कोणार्क आघाडीनं काँग्रेसच्या 47 पैकी 25 नगरसेवकांना फोडून भाजपसोबत जात महापौरपद मिळवलं... मात्र आता भाजप आमदार महेश चौगुले आणि कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्यात राडा झाला.. त्यानंतर विलास पाटील यांना अटक कऱण्यात आलीय.. तर कोणार्क आघाडी किंगमेकरच्या भुमिकेत असल्यानेच विलास पाटील यांना अडकवल्याचा आरोप करण्यात आलाय..

bhiwandi news
मेट्रोचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; मेट्रोनं घेतले बळी, जबाबदार कोण?

मात्र विलास पाटील यांच्या वकीलाच्या दाव्यानुसार खरंच कोणार्क आघाडीच्या हाती सत्तेची चावी आहे का? आणि सत्ता स्थापनेच्या काय शक्यता आहेत...पाहूयात...

काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष एकत्रित आले तर 48 नगरसेवकांच्या संख्याबळामुळे काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे... मात्र समाजवादी पक्षाचे नगरसेवक तटस्थ राहिले किंवा गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा खाली येईल.. त्यामुळे कोणार्क आघाडीचे 5 नगरसेवक किंगमेकरच्या भुमिकेत असण्याची शक्यता आहे... कारण शिंदेसेना, भाजप, अपक्ष आणि कोणार्क आघाडी एकत्र आल्यास 44 नगरसेवकांचं संख्याबळ होऊन भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो..

bhiwandi news
टी२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या संघातील सदस्याला हृदयविकाराचा झटका; खेळाडूंचं टेन्शन वाढलं

आता याच आकड्यांच्या जमवाजमवीसाठी महापौरपदाची निवड लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.. कारण आता महापौरपदाची निवडणूक 20 फेब्रुवारीला होणार असल्याचं समोर आलंय.. त्यामुळे 20 फेब्रुवारीपर्यंत कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांची सुटका होणार का? आणि कोणार्क आघाडी भाजपसोबत जात सत्ता स्थापन करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र असं घडलं तर सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसचा महापौर न होण्याची दुसऱ्यांदा नामुष्की ओढावेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com