टी२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या संघातील सदस्याला हृदयविकाराचा झटका; खेळाडूंचं टेन्शन वाढलं

Afghanistan cricket team : टी२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तान संघातील सदस्याला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेने खेळाडूंचं टेन्शन वाढलं आहे.
Afghanistan cricket team news
Afghanistan cricket teamSaam tv
Published On
Summary

टी२० वर्ल्डकपदरम्यान अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसलाय

केसी रामा सुब्रमणियन यांना हृदयविकाराचा झटका आला

दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल केलं

अफगाणिस्तान संघाला सलग दोन पराभवानंतर पुन्हा मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तान संघातील सदस्याला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संघातील खेळाडूंचं टेन्शन वाढलं आहे.

Afghanistan cricket team news
लाडक्या बहि‍णींना २ लाख रुपये मिळणार; पहिला हप्ता २० हजारांचा असणार, जाणून घ्या अटी आणि पात्रता?

स्पर्धेत न्यूझीलंडने ५ गडी राखून अफगाणिस्तानला धूळ चारली. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला. आता तिसऱ्या सामन्याआधी अफगाणिस्तान संघाचं टेन्शन वाढलं आहे. संघातील परफॉर्मेंस एनालिस्ट केसी रामा सुब्रमणियन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Afghanistan cricket team news
माजी खासदाराच्या शूटरची १५ गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

अफगाणिस्तान संघाचा पुढील सामना १६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरोधात नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी अफगाणिस्तान संघ हा दिल्लीत पोहोचला आहे. डेली मिररच्या रिपोर्टनुसार, अफगाणिस्तान संघातील परफॉर्मेंस एनालिस्ट केसी रामा सुब्रमणियन यांच्या छातीत ११ फेब्रुवारी रोजी दुखू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची एंजियोप्लास्टी केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Afghanistan cricket team news
Valentine Day Tragedy : व्हॅलेंटाइन डेला प्रेमाचा भयानक शेवट; बंद कारमध्ये आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह

अफगणिस्तान टीम मागील टी२० वर्ल्डकप सेमीफायलपर्यंत पोहोचली होती. यंदा सुरू असलेल्या स्पर्धेत त्यांचा प्रवास खडतर दिसत आहे. स्पर्धेतील २ सामने हातातून गमावल्यानंतर ग्रुप-डीमध्ये पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. अफगाणिस्तानने एकही सामना जिंकलेला नाही. तर त्यांचे दोन सामने अनुक्रमे १६ आणि १९ फेब्रुवारी रोजी अमेरिकेशी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com