Bhiwandi Latest news in Marathi : भिवंडी ग्रामीण भागात मंगळवारी सायंकाळी घरांना भूकंपसदृश हादरे जाणवले. मात्र हे हादरे नक्की कशामुळे जाणवले, याची अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी या परिसरात गंधकांमुळे गरम पाण्याचे कुंड आहेत, त्यामुळे सतत जमिनीतून गरम पाणी निघत असते. त्यातच मंगळवारी सायंकाळी येथील गणेशपुरी, वज्रेश्वरी परिसरातील काही घरांना भूकंपासारखे हादरे जाणवल्याचे स्थानिकांनी सांगितले; मात्र हे धक्के नक्की कशाचे होते, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
भिवंडीशिवाय कल्याणच्या सापर्डे गावाचा परिसर गूढ धक्क्यांनी हादरल्याचेही स्थानिकांनी सांगितले. मंगळवारी रात्री अचानाक गूढ धक्क्यांनी भिवंडी आणि आजूबाजूचा परिसरात हादरे बसण्यास सुरुवात झाली. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. कोन गाव, सरवली, तसेच भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये धक्के जाणवल्याची माहितीही मिळाली आहे. दोन दिवासांपूर्वीच मुरबाड तालुक्यातील काही गावांमध्येही असेच धक्के जाणवले होते. हा नेमका भूकंप होता, की आणखी काही कारणामुळे हादरे जाणवले, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. पण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
भिवंडी, भविंडी ग्रामीण आणि कल्याणच्या सापर्डे गावात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता अचानक जमीन हादरली. अचानक धक्के जाणवल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही सेकंदासाठी जमीन हादरल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रात्री अचानकच जाणवलेले हे हादरे कशामुळे जाणवले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अचानक जमीन का हादरली, याची चर्चा भिवंडीमध्ये सुरु आहे. दरम्यान या गूढ हादऱ्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या हादऱ्याची चर्चा आणखी वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.