Maharashtra weather news today live : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमान आणि किमान तापमानात घट झाल्याचे दिसत आहे. राज्यात हुडहुडी वाढल्यामुळे शेकोट्या पेटल्या आहेत. फॅन, एसी अन् कुलर बंद केले जात आहेत, त्याशिवाय कपाटातील गरम कपडे आता बाहेर काढले जात आहेत. पुढील काही दिवसांत थंडीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्याच्या तापमानात चढ उतार पाहायाला मिळू शकता. काही ठिकाणी थंडी अधिक वाढण्याचा इशारा देण्यात आलाय. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, नागपूर, कोल्हापूरसह राज्यात प्रमुख शहराच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे.
मुंबईकरांनाही गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. मंगळवारी मुंबईतील यंदाच्या वर्षातील सर्वात निचांकी १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे. थंडीमुळे मुंबईकरांनी रात्रीचे फॅन, एसी अन् कुलर बंद केल्याची परिस्थिती आहे. मुंबईकरांना दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत, तर रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे.
कमाल तापमानात घट झाल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या फेटल्या आहेत. सोलापूर, पालघर, पुणे, नाशिक, धुळेसह राज्यातील ग्रामीण भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे.
पुढील तीन महिने चांगल्या थंडीचे..
चक्रीवादळाचा काळ संपल्यामुळे हिवाळ्याला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्याचा अति उच्च काळ संपला आहे. प्रशांत महासागरात ला - निना सक्रीय होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात हिमालय आणि हिमालयाच्या रांगामध्ये अपेक्षित बर्फवृष्टी झाली आहे. थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे.
थंडीने हुडहुडी वाढली,शेकोट्या पेटू लागल्या.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरण बदलले पारा १० ते १३ अंशावर पोहचल्याने थंडीने हुडहुडी भरु लागल्याने थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहे.सकाळी घराबाहेर पडताना नागरीक ऊबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडतांना दिसत आहे. या थंडीचा फायदा गहू,हरभरा या पिकांना होणार आहे.
थंडीमुळे आजाराचा धोका बळावला
गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीत वाढ होत असल्याने सर्दी,खोकला आणि ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे रुग्णालयात पाहायला मिळत आहे.बदलत्या वातावरणाचा फटका सर्वाधिक लहानमुलांना बसत आहेत.जवळपास सर्वच खाजगी रूग्णालय रूग्णांनी खच्चाखच भरल्याचे दिसून आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.