मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

BEST Wet Lease Bus Accident In Andheri West Today: अंधेरी पश्चिम येथे बेस्टच्या वेट लीज बसचा भीषण अपघात; १४ वाहनांना धडक देत ६ ते ८ जण जखमी. कूपर रुग्णालयात उपचार सुरू, डी. एन. नगर पोलिसांचा तपास सुरू.
BEST wet lease bus after crashing into multiple vehicles near Andheri Market on SV Road in Mumbai.
BEST wet lease bus after crashing into multiple vehicles near Andheri Market on SV Road in Mumbai.saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील अंधेरी मार्केट परिसरात शुक्रवारी (१० जुलै) दुपारी बेस्टच्या वेट लीज बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावरील १४ वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत सहा ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींना कूपर रुग्णालयासह विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना सायंकाळी सुमारे ४.१५ वाजता घडली. मार्ग क्रमांक २४२ वरील बस (क्रमांक ७७९४, नोंदणी क्रमांक MH-01-DR-6418) मिल्लत नगर येथून अंधेरी पश्चिम बस स्थानकाकडे जात होती. अंधेरी सबवेजवळ सीझर रोडवरून एस. व्ही. रोडकडे उजवीकडे वळत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने समोर असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.

BEST wet lease bus after crashing into multiple vehicles near Andheri Market on SV Road in Mumbai.
केडीएमसीतील शिंदेसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी, नगरसेवक रमेश म्हात्रेंची महिला डॉक्टर्सना मारहाण

अपघातात ९ ऑटो रिक्षा, ४ खाजगी कार आणि १ तीनचाकी टेम्पोचे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी पोलिस आणि बेस्ट प्रशासनाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. त्यानंतर बस टो करून अंधेरी पश्चिम बस स्थानकात नेण्यात आली. बस चालक साहिल सूर्यकांत सावंत (वय ३०) आणि बस वाहक किरण आप्पा चव्हाण (वय ३५) हे दोघेही वेट लीज एमयूटीचे कर्मचारी असून, त्यांना चौकशीसाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

पुढील तपास डी. एन. नगर पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com