Accident News : बारामतीत भीषण अपघात! शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बस घाटात उलटली

Pune Baramati Accident News : बारामतीतील पाटस-सुपा मार्गावर सुपे घाटात एसटी बस पलटी झाली. बसमध्ये २५ ते ३० शालेय विद्यार्थी होते. २ ते ३ विद्यार्थी किरकोळ जखमी असून इतर विद्यार्थी सुखरूप आहेत.
Baramati depot ST bus overturns in Supe Ghat Accident News
Baramati depot ST bus overturns in Supe Ghat Accident News AI Image
Published On
Summary
  • पाटसहून सुप्याकडे जाणारी बारामती डेपोची एसटी बस सुपे घाटात पलटी

  • बस घाट चढत असताना अचानक मागे सरकल्याची प्राथमिक माहिती

  • बसमध्ये २५ ते ३० शालेय विद्यार्थी प्रवास करत होते

  • अपघातात २ ते ३ विद्यार्थी किरकोळ जखमी

बारामतीतील पाटसहून सुप्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला सुपे घाटात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. घाट चढत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस काही अंतर मागे सरकत जाऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून शाळेतील विद्यार्थी प्रवास करत होते. दरम्यान या दुर्घटनेत २ ते ३ विद्यार्थी जखमी झाले असून, इतर सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुपे घाट परिसरात घडला. एमएच २० बीएल ३१२१ क्रमांकाची बारामती डेपोची एसटी बस पाटसहून सुप्याकडे निघाली होती. बसमध्ये त्यावेळी जवळपास २५ ते ३० शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. बस सुपे घाट चढत असताना अचानक बस पुढे जाण्याऐवजी मागे रीव्हर्स जाऊ लागली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र बस मागे जात पलटी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Baramati depot ST bus overturns in Supe Ghat Accident News
Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या दोन ते तीन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी चौफुला येथील हर्ष हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Baramati depot ST bus overturns in Supe Ghat Accident News
UPI Payment : UPI पेमेंटवर आता शुल्क; २००० रुपयांच्या व्यवहारावर MDR लागू; कोणाला, किती अन् कधी लागू होणार? जाणून घ्या A टू Z माहिती

दरम्यान, बसमधील इतर विद्यार्थ्यांची पोलिसांकडून आणि संबंधितांकडून तपासणी करण्यात आली. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी पाठवल्यानंतर सुखरूप असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातामुळे पाटस-सुपा मार्गावर काही काळ वाहतुकीचा परिणाम झाला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि बसच्या तांत्रिक बिघाडाबाबत पुढील तपास पोलीस आणि संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com