Badlapur: बदलापूरमध्ये धबधब्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू , पाय घसरून पाण्यात पडली अन्...

Badlapur Waterfall Tragedy: बदलापूरमध्ये धबधब्यावर गेलेल्या तरुणीसोबत भयंकर घडलं. धबधब्यावर मजामस्ती करत असताना ती पाय घसरून पाण्यात पडली आणि बुडाली.
Badlapur: बदलापूरमध्ये धबधब्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू , पाय घसरून पाण्यात पडली अन्...
Badlapur Waterfall TragedySaam Tv
Published On
  • बदलापूरच्या बोराडपाडा धबधब्यावर भयंकर घटना घडली

  • १९ वर्षीय तरुणीचा धबधब्यात बुडून मृत्यू

  • मित्र-मैत्रिणींसोबत तरुणी धबधब्यावर गेली होती

  • पाय घसरून तरुणी पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला

अजय दुधाणे, उल्हासनगर

बदलापूरमध्ये पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यावर गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बदलापुरातील बोराडपाडा धबधब्यावर ही घटना घडली. पाय घसरून तरुणी खाली पाण्यात पडली आणि पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. ही तरुणी मित्र-मैत्रिणींसोबत याठिकाणी फिरण्यासाठी आली होती. ही तरुणी उल्हासनगरमध्ये राहणारी होती. तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, सांजली अश्वजीत मैत्रक (१९ वर्षे) असं मृत तरुणीचे नाव होते. ती मित्र-मैत्रिणींसोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी बदलापूरातील बोराडपाडा येथील धबधब्यावर गेली होती. पण धबधब्यावर मजा-मस्ती करत असताना सांजलीचा पाय घसला आणि ती खोल पाण्यात पडली. पोहचा येत नसल्याने सांजलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Badlapur: बदलापूरमध्ये धबधब्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू , पाय घसरून पाण्यात पडली अन्...
Badlapur : बदलापूरमध्ये रस्त्यातून निघतोय धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं का घडतंय असं? जाणून घ्या

सांजली ही उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी परिसरातील बुद्धज्योत बिल्डिंगमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती. ती विठ्ठलवाडी येथील वेदांत महाविद्यालयात एस.वाय. बी.कॉमचे शिक्षण घेत होती. सांजलीचे वडील अश्वजीत के. मैत्रक हे उल्हासनगरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तरुण वयात सांजलीचे असे अचानक आणि दुर्दैवी निधन झाल्याने मैत्रक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Badlapur: बदलापूरमध्ये धबधब्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू , पाय घसरून पाण्यात पडली अन्...
Missing Case : उर्दू शाळेच्या ४ अल्पवयीन मुली झाल्या होत्या बेपत्ता; परराज्यात लागला ठावठिकाणा, ३ दिवस कुठे होत्या?

पुण्यात अपघाताचा थरार -

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघातामध्ये बायलेकीचा मृत्यू झाला. चाकणजवळील वासुली येथे ही अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. चाकाखाली चिरडून बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत मुलीचा आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Badlapur: बदलापूरमध्ये धबधब्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू , पाय घसरून पाण्यात पडली अन्...
Badlapur News : बदलापुरात परप्रांतीय व्यक्तीच्या ११ हातगाड्या; सत्ताधारी नगरसेवकाचं स्टिंग ऑपरेशन, १००० अनधिकृत हातगाड्यांच्या दाव्यानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com