Badlapur : बदलापूरमध्ये रस्त्यातून निघतोय धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं का घडतंय असं? जाणून घ्या

Badlapur News : बदलापूरलगतच्या शिरगाव परिसरात रस्त्यातून अचानक धूर निघाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केमिकल गळतीचा संशय व्यक्त केला जात असून प्रशासन घटनास्थळी तपास करत आहे.
SMOKE ERUPTS FROM ROAD IN SHIRGAON NEAR BADLAPUR, CHEMICAL LEAK SUSPECTED | LATEST MAHARASHTRA NEWS
SMOKE ERUPTS FROM ROAD IN SHIRGAON NEAR BADLAPUR, CHEMICAL LEAK SUSPECTED | LATEST MAHARASHTRA NEWSSaam tv
Published On
Summary
  • बदलापूरच्या शिरगाव परिसरात रस्त्यातून अचानक धूर

  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • प्राथमिक माहितीनुसार, केमिकल गळतीचा संशय

  • प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पाहणी सुरू

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूर शहरालगतच्या शिरगाव परिसरात रस्त्यामधून अचानक धूर निघू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले . धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसू लागल्याने परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळले, तसेच तातडीने स्थानिक प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना केमिकल गळतीशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.

शिरगाव परिसरात यापूर्वीही वायू गळतीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या नव्या घटनेमुळे नागरिकांच्या मनातील भीती आणखी वाढली आहे. धुरामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली असून, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून, धुराचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

SMOKE ERUPTS FROM ROAD IN SHIRGAON NEAR BADLAPUR, CHEMICAL LEAK SUSPECTED | LATEST MAHARASHTRA NEWS
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

या घटनेनंतर शिरगाव, खरवई आणि माणकिवली एमआयडीसी परिसरातील रासायनिक उद्योग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

SMOKE ERUPTS FROM ROAD IN SHIRGAON NEAR BADLAPUR, CHEMICAL LEAK SUSPECTED | LATEST MAHARASHTRA NEWS
Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

परिसरात वारंवार अशा घटना घडत असतानाही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com