Badlapur News: बदलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार! २६० कोटींची पाणीपुरवठा योजना

Badlapur News : बदलापुरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता बदलापूरकरांना पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
Badlapur News
Badlapur NewsSaam Tv
Published On

बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. आता बदलापुरसाठी 74 किमी लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार आहे.पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Badlapur News
Vaishnavi Hagawane: वैष्णवीचे सासरे आणि दिराला अखेर अटक, ७ दिवसांपासून होते कुठे?

बदलापूरचा 2056 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूर शहरात होत असलेली पाणीबाणी अखेर संपणार आहे. कारण राज्य सरकारने नगरोत्थान योजनेतून बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केलीय. यासाठी आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे प्रयत्नशील होते. त्यानुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत 260 कोटींच्या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

बदलापूर शहराची लोकसंख्या जवळपास साडेचार लाख असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. बदलापूरला वाढीव पाणीपुरवठा योजना मिळावी, यासाठी बदलापुरातील आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Badlapur News
Mumbai Local Video: शिवीगाळ करणाऱ्याला लोकलमध्ये धडा! तरुणाने प्रवाशाला बेदम चोपला; VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या बदलापूर दौऱ्यात बदलापूरची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर राज्य सरकारने 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून बदलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय. या योजनेअंतर्गत बदलापुरात 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून 14 जलकुंभ उभारले जाणार आहेत. यामुळे पुढची अनेक वर्षे बदलापूरकरांना पाण्याची टंचाई भासणार नाही.

Badlapur News
Badlapur Tourism: बदलापूरमधील धबधब्याचे पावसातले दृश्य, One Day Trip साठी भन्नाट स्पॉट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com