
सोलापुरात आगीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
तसेच मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थससहाय्य देण्याची घोषणा केलीय.
फेसबुक पोस्ट करतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलीय
अवैध रेती वाहतुकी प्रकरणी जप्तीत असलेल्या यवतमाळच्या आर्णी तहसिल कार्यालयाच्या परिसरात उभ्या टिपरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.दरम्यान तहसीलमधील शिपाई आणि काही युवकांनी तहसील कार्यालयातील अग्निशमक सिलेंडरने तात्पुरती आग नियंत्रणात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.काहीवेळातच घटनास्थळी पालिकेची अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण आग नियंत्रणात आणली.
एम एच बी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारी
जुन्या वादातून आज झालेल्या या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी
एम एच बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
जळगाव जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे फळबागा, मका, ज्वारी आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
मारेगाव तालुक्यातील नेत गावात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात मोठी दुर्घटना घडली. शरद तुकाराम गेडाम (वय ५६) यांच्या शेतशिवारात वीज पडल्याने त्यांच्या २० बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर शरद गेडाम स्वतः किरकोळ जखमी झाले आहेत.
महाडमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर पक्षप्रवेश सभेला अवकाळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह तुफान पावसामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज एका शेतकऱ्याने दिलेली अनोखी भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दत्ता घाडगे या प्रयोगशील शेतकऱ्याने पवारांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट देत तब्बल ३ किलो वजनाचा आंबा त्यांना भेट दिला.
तारापूर एमआयडीसीमधील कॅमलिन कंपनीमध्ये आज सकाळी डायनिफिल सल्फेट या रासायनिक वायूची गळती होऊन दहा कामगार जखमी झाले आहेत. या वायूच्या संपर्कामुळे कामगारांच्या नाक, घसा आणि डोळ्यांना तीव्र जळजळ होण्याची लक्षणे दिसून आली आहेत. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अग्निशमन दलाला 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश आल्यानंतर पुन्हा धुमसली आग
अग्निशमन दलाचे पुन्हा आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु
अगीच्या लाटा आणि धुरांच्या काळ्याभोर धुराने अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात भीतीच वातावरण
दिवटे हे आमच्या कुटूंबातील सदस्यासारखा आहे...या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला आहे तसेच पोलिस अधिक्षकांनी देखील स्टेटमेंट दिले आहे की या प्रकरणात जातीपातीचे कारण नाही... आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलिस नक्की करतील असे आ.धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे... आ.धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात शिवराज दिवटे याची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच त्याच्या वडीलांशी देखील संवाद साधला.
परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्याची घटना घडली होती त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवराज शी चर्चा करत घटनेची माहिती घेत धीर दिला.
सर्वधर्म समाभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन...
भागवत यांच्या हस्ते संपन्न झाली साईबाबांची पाद्य पूजा...
धन्य हो गया.. साई दर्शनानंतर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया...
मोहन भागवत येणार असल्याने साई मंदिराला पोलिस छावणीचे स्वरूप...
साई दर्शनानंतर मोहन भागवत यांनी साधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद...
ज्या लोकांना बाहेर काढलेला आहे ते देखील मृत अवस्थेत आहेत
सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्याला लागलेल्या आगीत एकूण आठ लोकांचा मृत्यू झाला
पहाटे साडेपाच वाजता तीन कामगारांचा मृत्यू झाला होता
सेंटर इंडस्ट्रीजचे मालक हे आत मध्ये अडकल्याची माहिती होती त्यानुसार शोधकार्य पहाटेपासून सुरू होतं
हे सर्व पाच जण मास्टर बेडरूम मध्ये लपून बसले होते
दुर्दैवाने त्यांना बाहेर पडता आला नाही त्यामुळे श्वास गुदमरून आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे
तिरंगा यात्रेत देशभक्तीचा जागर....
सून ले बेटा पाकिस्तान तेरा बाप हिंदुस्तान च्या घोषणा...
भारत मातेचा करण्यात आला जय जयकार
सर्वसामान्य नागरिकांपासून ते सर्व राजकीय पक्षांची हजेरी....
सैन्य दलाला आपला पाठींबा दर्शविण्यासाठी नंदुरबारमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन...
खासदार संजय राऊत यांचे "नरकातील स्वर्ग" या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत झाल्यानंतर आता या पुस्तकाची चर्चा जोर धरू लागलीय. पुण्यात शिवसेने उद्धव बाळासाबेब ठाकरे पक्षाचे वसंत मोरे यांनी तर थेट हे पुस्तक त्यांच्या देव्हाऱ्यात ठेवलं आहे. मुंबईत प्रकाशन सोहळ्याला उपस्थितीत राहिलेल्या वसंत मोरे यांनी या पुस्तकाची एक प्रत घरी आणली. ही प्रत सध्या वसंत मोरे यांनी घरातील आपल्या देव्हाऱ्यात ठेवली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं आपण पारायण करणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.
बीडच्या परळी येथील जलालपूर येथे सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये एका काळ्या टी-शर्ट मधील समाधान मुंडे याला जमावाकडून मारहाण करण्यात येत आहे ही मारहाण जलालपूर भागात होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे तो तरुण हा शिवराज दिवटे महाराणा प्रकरणातील आरोपी समाधान मुंडे असल्याचे सांगण्यात आले आहे.
परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्याची घटना घडली होती त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलन मनोज जारंगे पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांनी शिवराज यशस्वी संवाद साधत तुझ्या पाठीशी आम्ही आहोत असा धीर देखील दिलाय.. या प्रकरणात दोषी असलेल्या वर तात्काळ कारवाई करावी अशी देखील मागणी जरांगे पाटील यांनी केली.
बीडच्या परळी मधील जलालपूर भागात अपहरण करत शिवराज दिवटे तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीनंतर घटनेचा निषेध नोंदवला गेला आज स्वतः मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील शिवराज दिवटे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दवाखान्यामध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते
या आगीत आणखीन पाच ते सहा जण अडकले असल्याची माहिती
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू
गेली दहा तासापासून आग सुरूच असल्याने शंभर होऊन अधिक गाड्यांची करण्यात आली पाण्याची फवारणी
घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम तर पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात
पाकिस्तान को मालूम होना चाहिये भारत पाकिस्तान का बाप है और बाप रहेगा........मी देखील एका माजी सैनीकाची मुलगी आहे..
काही लोक पहलगाम वर घरी एसीत बसून दुःख व्यक्त करत आहे.....
त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे? मुसलमान आहे तर कलमा वाचा.. पण आम्ही आमचं रक्त देऊ या देशासाठी पण कलमा वाचणार नाही.....
जय श्रीराम चा नारा देऊ,तोंडात बंदूक जरी लावली तरी आम्ही कलमा म्हणनार नाही.फक्त भारत माता की जय हात नारा आमच्या तोंडून निघेल.
हिंदुस्तान पर आख भी उठाई तो तुम्हाला बाप दिल्ली मे बैठा है मोदी
एक एक जीवाचा बदला हजारात घेई पर्यत मोदी शांत बसणार नाही....
अलमट्टी धरणाच्या उंचीवाडी विरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोल नाका या ठिकाणी सर्व पक्ष चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.मात्र आंदोलनाच्या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत असल्याचा प्रकार करण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री सतेज पाटलांनी थेट व्यासपीठावरून उतरत कार्यकर्त्यांना आडवण्याच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ऑपरेशन सिंदुर राबविल्या नंतर सेना दलाने केलेल्या कामगिरीचे कौतूक करण्यासाठी आणि दलाला आपला पाठींबा दर्शविण्यासाठी नंदुरबारमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करुन टाकले.
तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले.
भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ भाजपा पक्षातर्फे देशभर आगामी काळात भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर तिरंगा रॅली उदया नंदुरबार शहरातील नेहरु चौक – गांधी पुतळा – गणपती मंदीर – सोनार खुंट - जळका बाजार - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी संप्पन झाली.
या रॅलीत 500 मीटरचा तिंरगा घेवून नागरीक सहभागी झाल्याचे दिसून आले.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलंय .
आज डोंबिवलीत देखील तिरंगा रॅलीचा आयोजन करण्यात आला आहे तो मंदिरापासून ते धारडा सर्कल पर्यंत तयार रॅली आयोजन करण्यात आले हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत सहभागी झालेत .
भाजपाचे कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण ,भाजप आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे, यांच्यासह भाजप शिवसेना चे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते
देशभक्ती परत गीते लावण्यात आली होती तसेच नागरिकांनी भारत माता की जय ,वंदे मातरम ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता
या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळालं .यावेळी दहशतवाद्यांविरोधात संपूर्ण जग एकत्र झालंय त्यामुळे भारताला पाठिंबा मिळतोय असे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं
- गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे धनारणाचे काम
- अजित पवार यांच्या पुढाकाराने धरणाच्या कामाला मिळाली आहे मंजुरी
- कळवणचे आमदार नितीन पवार यांनी धरणाला मंजुरी मिळावी यासाठी केले होते प्रयत्न
- या धरणामुळे ओतूर गावसह अनेक गावांना मिळणार आहे पाणी
छत्रपती संभाजी नगर हून बेंगलोरला रवाना झाला होता ट्रक
आज आयआयटी जेईई परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना ट्राफिकचा करावा लागणार सामना
ट्रकमध्ये साधारणता सहाशे पोती कांदा असल्याची प्राथमिक माहिती
गाडीचे टायर फुटल्याने गाडी झाली पलटी,यामध्ये कोणतीही जीवित हानी
नाही तर वाहन चालक किरकोळ जखमी
दरम्यान पहाटे पाच वाजल्यापासून वाहतूक व्यवस्था विस्कळीत
पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा
वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्राफिक पोलीस स्वतः कांद्याचे पोते उचलत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
- दोन्ही नेते नाशिक जिल्ह्यात मात्र आज देखील भेट होण्याची शक्यता कमी
- अजितदादा यांच्या मागच्या दौऱ्यात छगन भुजबळ आणि अजित पवार नाशिक मध्ये येणार होते एकाच व्यासपीठावर
- मात्र अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर बिघाडामुळे मुळे दौरा रद्द झाल्याने त्यावेळेस देखील दोन्ही नेत्यांची भेट झाली नव्हती
- अजित पवार आज कळवण मध्ये तर छगन भुजबळ आहेत येवला मतदारसंघात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत दोन वेळा भेट घेणारे छगन भुजबळ यांच अजित दादांना भेयण्याचा योग्य मात्र येत नसल्याने सुरू आहेत वेगवेगळ्या राजकीय चर्चा
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युतर उन्हाळी 2025 नियमित परीक्षा सुरू आहेत.मात्र ज्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण,क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे परीक्षा देता आलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा 21 मे पासून विद्यापीठाने ठरवून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी एमकेसीएल च्या ऑनलाईन पोर्टलवर व विद्यार्थ्यांच्या मोबाईल ॲप मध्ये परीक्षेचे प्रवेश पत्र देण्यात येणार आहेत.अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे कळविण्यात आली आहे.
जालन्यातील परतुरसह मंठा तालुका आणि परिसरामध्ये शनिवारी मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे.
पावसामुळे परतूर शहरात नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
परतुर तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला.
परतुर शहरासह सातोना , आंबा, आष्टी आणि शिंगोणा येणारा आणि पाटोदा परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे.
या अवकाळी पावसामुळं भर उन्हाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. छोट्या नाल्यांना पाणी येऊन शेतातही पाणी साचले आहे..
ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर या आंदोलन करणार
कोथरुड येथील भिमनगरमधील रहिवास्यांकडून एसआरए योजने विरोधात लढा सुरू आहे.
बिल्डरकडून फसवणूक होत असल्याने स्थानिक नागरिक आक्रमक आहेत.या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी आंदोलन करण्यासाठी आल्या आहेत.
अलमटी धरणाच्या उंची वाढीविरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोलनाका या ठिकाणी
सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे.
नागपूर आणि सांगली कडून कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.कोल्हापूर कडून सांगली व नागपूरकडे जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे शि रोळ मिरज मार्गे तसेच कोथळी -हरिपूर मार्गे सध्या वाहतूक करण्यात आली आहे.
शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
काल मुंबईमध्ये येथे कार्यकर्त्यांना समवेत प्रवेश करण्यात आला.
काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर नाराज होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत.
गेल्या अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करत होतो मात्र वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी डावल्याने नाराज माहित निलगर यांनी कार्यकर्त्यां समवेत केला शिवसेनेत प्रवेश.
जालन्यात संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक करण्यात आली आहे.
जालन्यातील गोंदी तांडा येथील घटना असून या दगडफेकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
आशोक नागरगोजे आणि शाकेर सिद्दिकी अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर सध्या शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.
काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकी चोरीतील संशयित आरोपीला गोंदी पोलीस हे गोंदी तांडा येथे पकडण्यासाठी गेले होते.
यावेळी दोन पुरुषासह एका महिलेने पोलिसांच्या खाजगी गाडीवर आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे.
या दगडफेकी मध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे तर पोलिसाच्या खाजगी वाहनांच देखील नुकसान झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी संशयित सात आरोपीं विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलमट्टी धरणानाच्या उंची वाढी विरोधात कोल्हापूरच्या उदगाव येथील टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अलमट्टी धरणाची वाढविण्यात येणारी उंची रद्द करावी साठी चांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना या आता एकत्र आले आहेत आणि या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी ते आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे. चक्काजाम आंदोलनामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पाटील खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उदगावच्या टोल नाक्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
काल आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं अमरावतीमध्ये प्रचंड नुकसान..
अमरावती नजीकच्या अंजनगाव बारी परिसराला अवकाळी पावसाने झोडपलं
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा,आणि काढून ठेवलेला कांदा पावसामुळे झाला खराब..
शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला..
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान....
वादळी वारा आणि पावसाचा संत्रा ,बागा,ज्वारी आणि भाजी पाल्यालाहि मोठा फटका...
अवकाळी पावसाने कांदा भिजला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी.
पहलगाम येथे अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता.. याला भारतीय सेने दलाने जशास तसे उत्तर दिले आता भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी बीडच्या आष्टी शहरात आमदार सुरेश धस यांचे नेतृत्वाखाली विराट तिरंगा रॅली काढण्यात आली.. यावेळी आमदार सुरेश धस यांनी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानची नांगी ठेचत संपूर्ण जगाला संदेश दिला आहे.. भारतीय सैन्य दलाने अतिशय अचूकतेने हा हे प्रत्युत्तर देत पाकिस्तानला भारताच्या हद्दीत साधी टिकली सुद्धा वाजवू दिली नाही.. भारतीय सैन्य दलाच्या अचूकतेमुळे हे सर्व शक्य झाले.. निर्णयामुळे हे सर्व शक्य झाल्याचे मत देखील आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले..
पुणे पोलिसांच्या नजर चुकवून वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांना दंड बसणार आहे.पुण्यातील गोखले रस्त्यावर पुणे पोलिसाने ए आय टेक्नॉलॉजी लावली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर हैदराबादच्या एका कंपनीने हे दोन प्रणाली लावलेले आहेत.हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरात इतर ठिकाणी तटेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे.
ए आय टेक्नॉलॉजी द्वारे रस्त्यावर वाहन लावून जाणारे रस्त्यात,पार्किंग करणारे, रस्त्यावर वाहन लावून हॉटेलला जाणारे, जड वाहतूक करत वाहतुकीला अडथळा आणणारे,या सर्वावर या टेक्नॉलॉजीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
हे नियम मोडतानाचे सगळे पुरावे टेक्नॉलॉजी मध्ये पोलिसांकडे असणार आहेत.पुण्यातल्या गोखले रस्ता ते फर्ग्युसन कॉलेज पर्यंत रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या पुणेकरांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वादळी वाऱ्यासह पावसात पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळल्याने कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे
या कार्यालयात शेतकरी व नागरिकांची नेहमीच वर्दळ असते, मात्र घटनेवेळी कुणीही नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली आहे..
छताचा भाग कोसळला तरी कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत.
गेल्या महिन्यात तलाठ्यांनी याबाबत अहवाल तहसीलदारांना सादर केला असून, इमारत दुरुस्तीची मागणी केली आहे
सुमारे १०० वर्षे जुन्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून इमारतीत महसुली रेकॉर्ड असून, सुरक्षिततेसाठी तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे.
मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण झाली होती आणि आज प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या परळी सह बीड जिल्हा बंदची हाक विविध संघटनांकडून देण्यात आली आहे यामध्ये सर्व जाती धर्मांची लोक रस्त्यावरती उतरून परळी शहरांमध्ये घटनेच्या निषेधार्थ शांतता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग आणि ब वर्ग या दोन्हीही मधून या कारखान्यासाठी मतदान केलं आहे.
सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील भीषण आग विझावण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु
आग लागल्या नंतर तात्काळ मुबलक प्रमाणात पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या गाड्या झाल्या नसल्याचा मृतांच्या नातेवाईकांचा आरोप
स्थानिक लोकप्रतिनिधी ही घटनास्थळी उपलब्ध नसल्याचा नातेवाईक करतायत आरोप
या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप 4 ते 6 लोक टेक्सटाईल कंपनीत पडले आहेत अडकून
याबाबत मृतांच्या नातेवाईकांशी घटनास्थळावरून संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी
या दौऱ्यादरम्यान ते 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करणार
० बास रस्त्याचे काम रखडल्याने कायम वाहतुक कोंडीमुळे चर्चेत असणाऱ्या माणगाव येथे आढावा बैठक
० बायपासचे काम रखडल्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्याबाबत स्थानिक नागरीक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा
० संध्याकाळी महाडच्या चांदे क्रिडांगण येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांचा पक्ष प्रवेश
० शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रायगडच्या पालक मंत्री पदावरून वाद सुरु असताना मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादा काय बोलणार याकडे लक्ष
उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यानिमित्त आज महाड येथील चांदे क्रीडांगणावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भरत गोगावले यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या मेळाव्यात अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उत्तम दर्जाच्या आणि विहित दरात उपलब्ध व्हायला पाहिजे,यवतमाळ जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे खतांची विक्री ज्यादा दर लिंकिंग किंवा साठेबाजी सारखे प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला.यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थितीत होते.
वाशिमच्या मंगरूळपीर येथील लुल्ला वाईन शॉप मधील विदेश दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनांवर कारवाई करत दोन जन ताब्यात घेण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे अवैध धंदे करण्याऱ्या व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हि कारवाई वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी केली केलीये.
दोन लाख रुपयांची देशी विदेशी दारू सह एक चार चाकी वाहन असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात सहभागी असलेले 25 जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी हैदराबाद येथील भाविक के निर्मला रेड्डी यांनी ५ तोळ्यांचा सुवर्णहार अर्पन केला आहे.तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात यामध्ये अनेक भाविक देवीच्या चरणी दान अर्पण करत करत असतात.तेलंगणा येथील रेड्डी यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन सुवर्णहार अर्पण केला यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने देवीची प्रतिमा व महावस्त्रे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.
सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीन च्या सुमारास लागली भीषण आग
अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढलं आहे,यातील 3 लोक दगवाल्याची प्राथमिक माहिती आहे
तर अद्याप ही 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती
घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली आहे तर पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात आहे
रत्नागिरीत अवकाळी पावसानं हजेरी लावलीय मध्यरात्री जोरदार पाऊस रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कोसळला 18 मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला या हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खराब करताना आपल्याला पाहायला मिळतो या पावसामुळे पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात का होईना कमी झालीय तर गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे त्यांचा गारवा मिळाला आहे
सिडको प्रशासनाकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहे सिडको-बिल्डर लॉबीचं साटंलोटं; नवी मुंबईकरांची फसवणूक केली जात आहे मात्र प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून भूखंड दिले जात नाही मात्र बिल्डरांसाठी भूखंड देण्याचा काम केल्या जात असे असा गंभीर आरोप सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी केला आहे
१८ डिसेंबर २०१४ रोजी माजी महिला व बाल हक्क आयोग अध्यक्षा ॲड. मीनाक्षी जयस्वाल यांची त्यांच्या विश्वासू ड्रायव्हरने साथीदारासह निर्घृण हत्या केली होती.
दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसून तेरावेळा चाकूने वार करत त्यांची हत्या करून दागिने चोरले होते.
परिस्थितीजन्य पुरावे आणि २० साक्षीदारांच्या साक्षांवरून पनवेल न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मृत मीनाक्षी जयस्वाल यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल हे मालेगाव कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
हा खटला तब्बल १० वर्षं चालला असून, अखेर मीनाक्षी जयस्वाल यांच्या आरोपींना शिक्षा मिळाली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.