Badlapur Crime News : बदलापुरात अपहरण करून ९ वर्षांच्या मुलाची हत्या; गोणीत सापडला निष्पापाचा मृतदेह

Badlapur Crime News : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळ असलेल्या गोरेगाव गावात नऊ वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv

Badlapur Crime News :

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळ असलेल्या गोरेगाव गावात नऊ वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोरेगावात राहणाऱ्या व्यक्तीनेच या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची घटना घडली. बदलापुरातील गोरेगावात नऊ वर्षांच्या मुलाची अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेने बदलापूर परिसरात खळबळ माजली आहे.

Crime News
Crime News: झोपेतच हत्या केली नंतर पेट्रोल टाकून जाळले; 5 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी चुलत भाऊ अन् काकाने केला घात

नेमकं काय घडलं?

इबादत बुबेर नावाचा मुलाने रविवारी रात्री नमाज अदा केली. त्यानंतर मशिदीतून बाहेर पडला. यावेळी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुलाचे अपहरण केले. या अपहरणकर्त्याने त्यानंतर इबादतच्या वडिलांना फोन करून २३ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर अपहरणकर्त्याने फोन बंद केला. मुलाच्या कुटुंबीयांनी तातडीने बदलापूर ग्रामीण पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर बदलापूर ग्रामीण पोलीस आणि गुन्हे शाखा रात्रभर निष्पाप मुलाचा शोध घेत होते.

यावेळी गावातील रहिवाशाच्या घरात पोत्यात मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्या घरातील संपूर्ण कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निष्पाप मुलाचा मृतदेह शविच्छेदनासाठी मुंबईत जे जे रुग्णालयात पाठवला.

Crime News
Crime News: यात्रेतून परतणाऱ्या १७ वर्षीय तरूणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू; उज्जैनमधील खळबळजनक घटना

धुलीवंदनाच्या एका मुलाचा अपहरण करून हत्या केल्यामुळे संपूर्ण गोरेगाव - वांगणी परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकारे अधिक तपास कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. पोलिसांकडून या आरोपींचा शोध लागला आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी स्वामी यांनी म्हटले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com