दोन भावांची झोपेत असताना हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल पेटवून दिल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर (Kanpur) येथून हे धक्कादायक हत्यांकांड समोर आलं आहे. पोलीस तपासात या दोघांपैकी एकाचा खून काका आणि सख्ख्या चुलत भावाने केल्याचं ( Killed Brother For Property) समोर आलं आहे. (Latest Crime News)
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि वैमनस्य या कारणावरून चुलत भावाची हत्या झाल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे. हा खून करण्यासाठी आरोपींनी वीस लिटर पेट्रोल (Uttar Pradesh Crime News) आणि सात किलो गॅसचा वापर केला होता. कानपूरच्या सेन पश्चिम पारा येथील काशी गावात दोन चुलत भावांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. घटनास्थळीच पोलिसांना आरोपीवर संशय आला. मात्र, पोलिसांनी तपासाशिवाय कोणतीही कारवाई केली नाही. गेल्या मंगळवारी रात्री काशी गावात घरात झोपलेल्या चुलत भावांची हत्या करण्यात आली होती. हत्येला अपघात वाटावा यासाठी दोघांनाही पेट्रोल टाकून जाळण्यात आलं (Uttar Pradesh Crime) होतं. या संपूर्ण घटनेत कुटुंबीयांनी मालमत्तेच्या वादातून चुलत भाऊ आणि त्यांच्या साथीदारावर खून केल्याचा गंभीर आरोप केला होता.
या प्रकरणाचा खुलासा करताना डीसीपी दक्षिण रवींद्र कुमार यांनी सांगितलं की, मृत अनिल आणि राज यांच्या हत्येसंदर्भात राजच्या वडिलांनी काही लोकांविरूद्ध तक्रार केली होती. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध सर्व पुरावे गोळा (Crime News) केले. त्यानंतर त्यांची कोठडीत चौकशी करण्यात आली. सुरूवातीला चौकशीदरम्यान आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. मात्,र पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली असता सत्य बाहेर आलं.
चुलत भाऊ विनोद सिंग आणि काका बदलू प्रसाद यांनी खून केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. दोन्ही मृतांना जाळताना आरोपी विनोद सिंगचा चेहराही भाजला असल्याचं पोलिसांनी (Cousin And Uncle Killed Brother In Kanpur) सांगितलं. चौकशीमध्ये त्याने या मृत मुलांना वाचवायला गेल्यावर चेहरा भाजल्याचे पोलिसांना सांगितले होते. आरोपींनी सांगितलं की, अनिल त्यांना दररोज शिवीगाळ आणि मारहाण करायचा. त्यांच्यामध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. या कारणावरून चुलत भाऊ आणि काकांनी मिळून त्यांच्या हत्येचा कट रचला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.