Karnataka Crime: खजिन्याचा मोह नडला! कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; कर्नाटकमधील थरारक घटना

Crime News: कर्नाटकच्या तुमाकुरू जिल्ह्यामध्ये हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली असून गुप्त खजिन्याचे आमिष दाखवून या तीनही तरुणांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Karnataka Crime News:
Karnataka Crime News:Saamtv

Karnataka Crime News:

कर्नाटकमध्ये एका कारमध्ये तीन तरुणांचे जळालेले मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कर्नाटकच्या तुमाकुरू जिल्ह्यामध्ये हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली असून गुप्त खजिन्याचे आमिष दाखवून या तीनही तरुणांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Crime News in Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कर्नाटकातील (Karnataka) तुमाकुरू जिल्ह्यात कारमध्ये जळालेले तीन जण मंगळुरूमधील बेलथंगडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांना 'खजिना' देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तुमकुरु पोलिसांच्या काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तुमकुरुचे पोलीस अधिक्षक अशोक केव्ही म्हणाले की, तुमकुरू शहराच्या बाहेरील कुचंगी गावात तलावाच्या काठावर शुक्रवारी एका कारमध्ये तीन जळालेले मृतदेह सापडले होते. हे तरुण कर्नाटकातील मंगळुरु जिल्ह्यातील बेलथांगडी तालुक्यातील रहिवासी आहेत. गुन्हेगारांनी गुप्त 'खजिना' देण्याच्या आमिषाने पीडितांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Karnataka Crime News:
Loksabha Election 2024: निलेश लंकेंची एन्ट्री जोरदार करायची.. काँग्रेस नेत्याचे सूचक विधान; नगर दक्षिणमध्ये विखे विरुद्ध लंके सामना फिक्स!

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवले होते. त्यांना काही गाडलेला खजिना सापडला होता ज्यात सोन्या-चांदीचे दागिने होते आणि त्यांना ते स्वस्त दरात विकायचे असल्याचे आमिष दाखवण्यात आले होते. याच आमिषाला बळी पडून तिन्ही तरुण पैसे घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर आरोपींनी या तिघांचीही हत्या केली आणि त्यांच्याकडील पैसे लुटून मृतदेह कारमध्ये जाळले. (Latest Marathi News)

Karnataka Crime News:
Kalyan News : क्षुल्लक कारणावरून दिव्यांग मुलासह पती- पत्नीला मारहाण; कल्याणमधील धक्कादायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com