Badlapur Local : मुंबईकडे जाणारी लोकल तब्बल ४० मिनिटं उशिरा, बदलापूरकरांचा संताप उफाळला

Badlapur CSMT local train delayed by 40 minutes : बदलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळी प्रचंड गोंधळ झाला. खोपोलीहून येणारी सीएसएमटी लोकल तब्बल ४० मिनिटे उशिरा आली. त्यामुळे स्थानकात तुफान गर्दी झाली आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
Badlapur CSMT local train delayed by 40 minutes
Badlapur CSMT local train delayed by 40 minutes
Published On

Morning rush in Badlapur due to local train delay : बदलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळच्या सुमारास पुन्हा गोंधळ झाला. खोपोलीहून येणारी ट्रेन ४० मिनिट उशीर आल्यानं रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली. या विरोधात रेल्वे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. संतप्त प्रवाशांची रेल्वे आरपीएफ सोबत बाचाबाचीही झाली. सकाळी 7 वाजून 14 मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला. नेहमीप्रमाणे बदलापूरकर कामावर जाण्यासाठी निघाले होते मात्र खोपोलीहून येणाऱ्या लोकलऐवजी एक्सप्रेसला प्राधान्य देण्यात आल्यामुळे लोकलला 40 मिनिटे उशीर झाला, त्याचा परिणाम म्हणजे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय.

बदलापूर रेल्वे स्थानकात ७:१४ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल तब्बल ४५ मिनिटे उशिराने धावत असल्याने नागरिकांचा संताप अनावर आला. संतप्त प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल उशिरा धावत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. लोकलच्या या दिरंगाईमुळे कामावर वेळेवर पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या नोकरदारांचे मोठे हाल झाले. "७:१४ ची ट्रेन अद्याप नाही, ४५ मिनिटांची प्रतीक्षा, बदलापूरकरांचा संताप उफाळला!" अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्यात.

Badlapur CSMT local train delayed by 40 minutes
Badlapur Local : मुंबईकडे जाणारी लोकल तब्बल ४० मिनिटं उशिरा, बदलापूरकरांचा संताप उफाळला

लोकलचा हा लेटमार्क मध्य रेल्वेच्या कर्जत-बदलापूर मार्गावरील प्रवाशांसाठी दररोजची डोकेदुखी असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. कर्जत, भिवपुरी, नेरळ, शेलू, वांगणी, बदलापूर आणि अंबरनाथ यांसारख्या शहरांमधून दररोज लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मात्र, त्यांना दररोज लेटमार्कचा सामना करावा लागतो. तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणेतील अडथळे आणि रेल्वे रुळांवरील कामांमुळे गाड्या उशिराने धावणे हे नित्याचे झाले आहे.

Badlapur CSMT local train delayed by 40 minutes
Accident : इंजिनियरचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, भिवंडीत भयंकर अपघात, आई-वडिलांचा आक्रोश

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

आजच्या विलंबानंतर अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला. #BadlapurTrainDelay, #CentralRailway, #CommuterWoes यांसारखे हॅशटॅग वापरून त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. यापूर्वीही बदलापूर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वेच्या दिरंगाईविरोधात अनेकदा उत्स्फूर्तपणे 'रेल रोको' सारखी आंदोलने केली आहेत.

Badlapur CSMT local train delayed by 40 minutes
एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com