Badlapur : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! घरपट्टीत ५०% सवलत

Badlapur Budget News : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा १०९८ कोटी रुपयांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये मालमत्ता करात ५० टक्के सवलत, आरोग्य-शिक्षणासाठी कोट्यवधींची तरतूद आणि विविध विकास योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
Badlapur : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! घरपट्टीत ५०% सवलत
Badlapur Budget NewsSaam Tv
Published On
Summary
  • बदलापूर नगरपालिकेने १०९८ कोटी रुपयांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला

  • ३१ मार्चपूर्वी थकबाकी नसलेल्या करदात्यांना मालमत्ता करात ५०% सवलत देण्याची घोषणा

  • आरोग्य, शिक्षण, क्रीडा, घनकचरा व्यवस्थापन आणि रस्ते विकासासाठी कोट्यवधींची तरतूद

  • १० वर्षांनंतर लोकनियुक्त नगराध्यक्षांनी सादर केलेला हा पहिला अर्थसंकल्प

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १ हजार ९८ कोटींचं अंदाजपत्रक सादर झालंय. बदलापूरच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी ११.७६ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देण्यासोबत मालमत्ता करात ५० टक्के सवलत आणि नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेसारख्या महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आलीय. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही संमतीनं पालिका सभागृहात एकमतानं या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. आता हा अर्थसंकल्प पुढील मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहेत.

बजेटमधून बदलापूरकरांना काय मिळणार?

३१ मार्चपूर्वी शून्य थकबाकी असणाऱ्या करदात्यांना मालमत्ता करात ५० % सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतरच हा निर्णय अंमलात येईल. या अर्थसंकल्पात महिला आणि बालकल्याण विभागासाठी ३.८० कोटींची तरतूद करण्यात आलीय. नगराध्यक्ष सुकन्या योजनेच्या माध्यमातून बदलापुरात जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत केलं जाईल. तिच्या नावाने ५ हजारांची ठेव ठेवण्यात येईल, वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठेवीचा शिक्षणासाठी उपयोग करता येईल. सांस्कृतिक भवनासाठी ५ कोटी, नगराध्यक्ष आरोग्य योजनेसाठी १ कोटी, गर्भसंस्कार केंद्रासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आलीय. शिक्षणासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्याअंतर्गत नगरपालिकांच्या शाळांना आणखी सक्षम केलं जाईल. नगरपालिकेच्या शिक्षकांना सानुग्रह अनुदान देण्यात येणारंय. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास दुबे रूग्णालयाच्या नुतीनकरणासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आलीय.

Badlapur : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! घरपट्टीत ५०% सवलत
Mumbai : मुंबईत क्रिप्टो स्कीमचा भंडाफोड; तब्बल ६.५० कोटी लुबाडले, मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

याठिकाणी राज्य शासनाच्या सहकार्यातून मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. याशिवाय शिरगावात ५ कोटींचं योग भवन, घनकचरा व्यवस्थापनासाठी ४०.२० कोटी, क्रीडा संकुलासाठी १० कोटी, नाट्यगृहासाठी ५ कोटी, शिवसृष्टीसाठी ५ कोटी, हिंदू-हदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी १ कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासाठी १ कोटी, सोनिवली रस्ता सुशोभिकरणासाठी १ कोटी, नगराध्यक्ष क्रीडा स्पर्धा २५ लाख, दुर्बल घटकांसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आलीय.

Badlapur : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! घरपट्टीत ५०% सवलत
Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

दिव्यांग पेन्शन योजनेत याआधी १००० रूपये पेन्शन देण्यात येत होती ती आता २००० रूपये करण्यात आलीय, तर दिव्यांगांना औषध उपचारासाठी दिली जाणारी वैद्यकीय मदत २५ हजार असेल, भुयारी गटार योजनेसाठी २६७ कोटी, श्वान निर्बिजीकरणासाठी २ कोटी, फिडिंग पॉईंटसाठी २५ लाख, श्वान निवारा केंद्रासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आलीय. समाजातील सर्व घटकांना डोळ्यांसमोर ठेऊन, विकासाच्या अनुषंघाने हा अर्थसंकल्प मांडल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी दिलीय. तर महिला, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते यावर भर देणारा हा अर्थसंकल्प असून यात खऱ्या अर्थाने विकासाची पंचसूत्री असल्याचं उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांनी म्हंटलंय.

Badlapur : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! घरपट्टीत ५०% सवलत
Kalyan : कल्याणकर संतापले! भूमाफियांविरोधात चक्क 'म्हैस' घेऊन थेट KDMC कार्यालयात धडक, वाचा नेमकं प्रकरण काय?

१० वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकनियुक्त नगराध्यक्षांनी बजेट सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संकल्पात विकासाच्या अनेक प्रकल्पांवर भर देण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे पालिकेनं नागरिकांवर नव्या करांचा कोणताही बोजा टाकलेला नाही. बारामतीच्या धर्तीवर बदलापूरचा विकास असो, वा सुटसुटीत मालमत्ता कर आकारणी धोरण सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शहरविकासाला गती देण्याचा प्रयत्न केला असला तरी या अर्थसंकल्पातील घोषणांची काटेकोर अंमलबजावणी होणंही तितकच गरजेचं आहे. १ हजार कोटींचा हा अर्थसंकल्प हवा भरलेल्या फुग्यासारखा असू नये हीच अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com