Iyengar Fresh Cake Bakery: खारीत उंदराचा वावर, केकमध्ये विष्ठा; अय्यंगार फ्रेश केक बेकरीतील किळसवाणा प्रकार

Badlapur Iyengar Fresh Cake Bakery : बदलापूरमध्ये एका केकवर कथितरीत्या उंदराची विष्ठा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तक्रारीमुळे बेकरीमधील अस्वच्छ परिस्थिती, उंदरांचा वावर आणि स्वच्छतेबाबतच्या गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत.
Badlapur Iyengar Fresh Cake Bakery :
Iyengar Fresh Cake Bakery hygiene violation controversysaam tv
Published On
Summary
  • बदलापूरमध्ये केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा प्रकार

  • अय्यंगार फ्रेश केक बेकरीतील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न

  • बेकरीमध्ये उंदरांचा वावर आणि अन्न सुरक्षेचा मुद्दा

बदलापुरात केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. एका नगरसेविकेसोबत हा प्रकार घडला असून यानंतर नगरसेविकेनं जेव्हा दुकानात जाऊन जाब विचारला तेव्हा दुकानात खारीवर उंदीर फिरत असल्याचं आणि केक बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी चक्क संडासच्या कमोडवर ठेवल्याचं किळसवाणं दृश्य पाहायला मिळालं.

Badlapur Iyengar Fresh Cake Bakery :
FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

बदलापूरमध्ये अय्यंगार फ्रेश केक नावाची बेकरी असून त्यांच्या बेलवली आणि कात्रप अशा 2 शाखा आहेत. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांनी बेलवलीतल्या बेकरीतून रवा केक आणला होता. हा केक खाताना हर्षाली गायकवाड यांना त्यात उंदराची विष्ठा असल्याचं आढळलं आणि त्यांना उलट्या, मळमळ याचा त्रास झाला. याचा जाब विचारण्यासाठी त्या बेकरीत गेल्या असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी ही उंदराची विष्ठा नसून चोकोचिप असल्याचं सांगितलं. मात्र केक टेस्टिंगसाठी पाठवते, असं त्यांनी म्हणताच कर्मचाऱ्यांनी चूक कबूल केली.

Badlapur Iyengar Fresh Cake Bakery :
बदलापूरकरांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी! पुढील १० वर्षांत शहरात होणार 'हा' मोठा बदल...;

याचदरम्यान या बेकरीत खारीमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला. तर नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी केक जिथे बनवतात त्या जागेची पाहणी केली असता अतिशय अस्वच्छ वातावरण आणि केक बनवायची भांडी चक्क संडासातल्या कमोडवर ठेवल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला.

त्यामुळं आता या बेकारीची एफडीएकडे तक्रार करण्याचा निर्णय नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी घेतला असून नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही बेकरी बंद करावी, अशी मागणी आता केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com