बदलापूरकरांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी! पुढील १० वर्षांत शहरात होणार 'हा' मोठा बदल...;

Badlapur Green City Project 2035 Details: बदलापूर शहरासाठी मोठी खुशखबर! ‘हरित बदलापूर 2035’ अंतर्गत 10 वर्षांचा पर्यावरणपूरक विकास आराखडा तयार. ऑक्सिजन पार्क, नागरी जंगले, वृक्ष मॅपिंगसह शहराचा कायापालट होणार.
Badlapur set for a green transformation with urban forests, oxygen parks, and a 10-year eco-friendly development plan.
Badlapur set for a green transformation with urban forests, oxygen parks, and a 10-year eco-friendly development plan.saam tv
Published On

बदलापूर शहराला पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हरित बदलापूर 2035 या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत नगर परिषद आणि दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामध्ये एक महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या काराराअंतर्गत पुढील 10 वर्षांसाठी बदलापूर शहराचा वैज्ञानिक हरित विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

Badlapur set for a green transformation with urban forests, oxygen parks, and a 10-year eco-friendly development plan.
Badlapur : अनधिकृत फळ विक्रेत्यांची खैर नाही! बदलापूर नगरपालिकेकडून कारवाई सुरू

या प्रकल्पाचा माध्यमातून शहरातील वृक्षांचे डिजिटल मपिंग करणे, ऑक्सीजन पार्क उभारणे, नागरी जंगले आणि जैवविविधता उद्याने विकसित करणे, तसेच जलस्रोतांचे हरीतीकरण अशा विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी कोकण कृषि विद्यापीठाचे वैज्ञानिक आणि तांत्रिक मार्गदर्शन लाभणार असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून यासाठी निधी उभारला जाणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण राज्यातील नगरपरिषदांसाठी एक आदर्श पॅटर्न ठरेल, असा विश्वास नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केला.

Badlapur set for a green transformation with urban forests, oxygen parks, and a 10-year eco-friendly development plan.
PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

बदलापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध हवा मिळावी यासाठी हा १० वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ प्रशासनच नाही, तर बदलापूरकर नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा आणि वृक्षसंवर्धनाची एक मोठी लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com