बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

Badlapur news : बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
badlapur case
badlapur news Saam tv
Published On
Summary

बदलापुरात स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार

बदलापूर पश्चिमेकडील धक्कादायक घटना

स्कूल व्हॅन चालकाला अटक, गुन्हा दाखल

बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीय. स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय. बदलापूर पश्चिमेकडे ही घटना घडलीय. पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केलाय.

बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.

आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. घटनेनंतर बदलापूर अत्याचार प्रकरणात फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ही टीम आरोपी व्हॅनचालकाची तपासणी करणार आहे.

badlapur case
बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

चिमुकलीवरील अत्याचाराचा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळलीय.

badlapur case
अकोल्यात राजकारण तापलं! भाजपविरोधात विरोधक एकत्र; ठाकरे गटाला 'महापौरपद', 'वंचित'ला काय?

तत्पूर्वी, बदलापुरात काही महिन्यांपूर्वी नामांकित शाळेत चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली होती. बदलापूरकरांनी लोकल ट्रेन रोखून ठेवल्या होत्या. या घटनेतील मुख्य आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. त्यानंतर आज झालेल्या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाईची मागणी बदलापूरकर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com