Akshay Shinde Case: पेढे वाटले अन् फटाके फोडून जल्लोष केला; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापुरात काय घडलं? पाहा VIDEO

Badalapurkar Celebration After Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या इन्काउंटरनंतर बदलापूरकरांनी जल्लोष करत पेढे वाटले आणि फटाके फोडले.
Akshay Shinde Case: अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये जल्लोष, पेढे वाटत बॅनर झळकावले
Badalapurkar Celebration After Akshay Shinde EncounterSaam Tv
Published On

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर बदलापुरमधील नागरिकांनी एकच जल्लोष केला. अक्षयच्या एन्काउंटरनंतर बदलापुरमध्ये महिलांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर बॅनर झळकावत जल्लोष करण्यात आला. अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या किंवा फाशी द्या अशी मागणी बदलापुरच्या नागरिकांनी केली होती. यासाठी त्यांनी रेलरोको आणि रास्तारोको आंदोलन देखील केलं होतं.

अक्षय शिंदेचा इन्काउंटर केल्यानंतर बदलापूरमध्ये ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. त्याच शाळेबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत यावेळी शिवसेनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे आभार मानले. बदलापुरात महिलांनी एकमेकांना पेढे वाटले आणि आनंद साजरा केला. यावेळी 'चिमुकल्यांना न्याय मिळाला, अक्षय शिंदे नरकात गेला' अशा घोषणा देण्यात आल्या.

Akshay Shinde Case: अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये जल्लोष, पेढे वाटत बॅनर झळकावले
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे संजय शिंदे आहेत तरी कोण?

तर अक्षय शिंदेच्या इन्काउंटरनंतर आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी बॅनर्स झळकावले. 'नराधमाला शिक्षा मिळालीच', 'नराधम मेला आत्मा शांत झाला', 'एकनाथ...एक न्याय बलात्काराला थारा नाय 'अशा आशयाचे बॅनर झळकावण्यात आले. बदलापूर रेल्वे स्थाकावर देखील पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. अखेर पीडित मुलींना न्याय मिळाला. यावेळी सर्वांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. एका गुन्ह्याच्या प्रकरणात सोमवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय शिंदे याचा तपास करण्यासाठी त्याचा ताबा घेतला. अक्षयला घेऊन हे पथक ठाण्याच्या दिशेने येत असताना मुंब्रा बायपासवर अक्षयने पोलिसांची रिवाल्वर हिसकवली आणि पोलिसांवर गोळीबार केला. यादरम्यान स्वसंरक्षनार्थ पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली. या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला.

Akshay Shinde Case: अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये जल्लोष, पेढे वाटत बॅनर झळकावले
Akshay Shinde : गुन्हा सिद्ध झाला नाही, प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलं, अक्षय शिंदेच्या आईचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com