कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध

kalyan taloja metro rail : ही बांधकामे हटविण्याची नोटिस या पूर्वीच तहसील कार्यालकाडून संबंधितांना देण्यात आली आहे. गायरान जमीनीवरील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे नियमित करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने सन २०२२ कालावधीत दिला आहे.
farmers protest against land survey of kalyan taloja metro rail
farmers protest against land survey of kalyan taloja metro railSaam Digital
Published On

- अभिजीत देशमुख

कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामासाठी जागेचे सर्वेक्षण नंतर करा पहिल्यांदा माेबदला द्या अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेत जागेच्या सर्वेक्षणास विरोध. हा प्रकार डोंबिवली गावडे सोनार पाडा उंबरली रोड येथील माणगाव परिसरात घडला. दरम्यान अधिकारी व कर्मचा-यांनी पाेलिस बंदाेबस्तात कामास प्रारंभ केला.

farmers protest against land survey of kalyan taloja metro rail
SAAM Impact: कोयना परिसरातलं गाव GST आयुक्तांनी विकत घेतलं, जमीन सरकारजमा होणार

डोंबिवली जवळील उंबर्ली रोड मानगाव परिसरातील जागा राज्य सरकारने महसूल खात्यामार्फत कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाकरीता वर्ग केली आहे. प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आलेली जागा ही गायरान आहे. या गायरान जागेवर अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे आहेत.

farmers protest against land survey of kalyan taloja metro rail
Kasara Ghat Traffic Update: आदिवासी विभागाचा बिऱ्हाड मोर्चा पाेचला कसारा घाटात, जाणून घ्या वाहतुकीची स्थिती

आज (शुक्रवार) सकाळी एमएमआरडीचे पथक तहसीलदारांचे पथक मोठ्या पोलिस बंदोबस्तात या जागेवर दाखल झाले. त्यांनी सर्वेक्षण तसेच बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली . या कारवाईला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला.

स्थानिक शेतकरी दशरथ म्हात्रे यांनी आमची शेतजमीन वडिलोपार्जित आहे. ही जागा प्रकल्पाच्या बाधित गायरान जमीनीच्या मध्ये आहे. त्याठिकाणी एमएमारडीएकडून जबरदस्तीने सर्वेक्षण केले जात असल्याचे म्हटले.

आमच्या शेतजागेचा मोबदला आम्हाला द्यावा. मगच सर्वेक्षणाचे काम करावे. या बाधित शेतक-यांच्या बाजूने शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील यांनी देखील या सर्वेक्षणास विरोध केला. या ठिकाणी असलेल्या पाच बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सह्याचे एक निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध केला असला तरी सर्वेक्षण करणा-या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे.

Edited By : Siddharth Latkar

farmers protest against land survey of kalyan taloja metro rail
Maharashtra Milk Price Issue: दूधदरासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर, नगर जिल्ह्यात रास्ता राेकाे आंदाेलनास प्रारंभ (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com