Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे संजय शिंदे आहेत तरी कोण?

Badlapur Case: बदलापुरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला. त्याचा एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी कोण आहेत हे घ्या जाणून...
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे संजय शिंदे आहेत तरी कोण?
Akshay Shinde EncounterSaam Tv
Published On

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते तेव्हा त्याने बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केल्याचा पोलिसांनी दावा आहे. या गोळीबारात पोलिस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. पोलिसांनी आपल्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या आणि त्याचा एन्काउंटर केला. अक्षयचा एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी संजय शिंदे आहेत तरी कोण? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला तेव्हा पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदेचा जागीच मृत्यू झाला. संजय शिंदे यांचा इतिहासही खूप रंजक आहे. त्यांनी आयपीएस प्रदीप शर्मा यांच्यासोबत पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे.

१९८३ मध्ये पोलिस दलात दाखल झालेले प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे. संजय शिंदे यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचाही समावेश होता. बदलापूर प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथक म्हणजे एसआयटीमध्ये त्यांचा सहभाग आहे.

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे संजय शिंदे आहेत तरी कोण?
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटर थरार, मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं? खळबळजनक माहिती समोर

संजय शिंदे यांच्या नावावरून सध्या वाद सुरू आहेत. पोलिस चौकशीदरम्यान खुनाचा आरोपी विजय पालांडे याला पोलिस कोठडीतून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. विजय पालांडे यांच्या गाडीत त्यांचा गणवेशही सापडला होता. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती आणि त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर संजय शिंदे २०१४ ला पुन्हा सेवेमध्ये रुजू झाले.

या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुती सरकारने आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वीच ठार मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपला निषेध व्यक्त करत सांगितले की, 'यातून सरकारची अक्षमता दिसून येते आणि ही केवळ एक कथा आहे जी सरकारने लिहिली आणि अंमलात आणली.'

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे संजय शिंदे आहेत तरी कोण?
Akshay Shinde : गुन्हा सिद्ध झाला नाही, प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलं, अक्षय शिंदेच्या आईचा गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com