सचिन गाड
Anil Parab News: दोपालीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल परब यांना 21 जूनपर्यंत अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम राहणार आहे. यामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा कायम राहणार आहे. या प्रकरणात अनिल परब यांना 21 जूनपर्यंत अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम राहणार आहे.
ईडीनं साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल परबांचं नाव नाही. मात्र व्यवहाराची त्यांना पूर्ण कल्पना असल्याचा वारंवार उल्लेख आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी झाली.
मात्र, अनिल परब यांचा आरोपी म्हणून उल्लेख नसला तरी या आरोपपत्रात वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. तर अनिल परब यांच्यासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात अनिल परब यांना २१ जूनपर्यंत अटेकपासून संरक्षण मिळालं आहे . रम्यान, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणी जयराम देशपांडे आणि सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.