Alandi Wari News : ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी करावं, पण...; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला

Chandrashekhar Bawankule News: फडणवीस यांनी काल घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule saam tv
Published On

Chandrashekhar Bawankule On Alandi Wari : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्जच्या घटनेवर राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे या घटनेवरून एकिकडे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जातेय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज झालाच नाही असा दावा केला आहे. परंतु या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार होत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले की आळंदीत लाठीचार्ज झाला नाही. तसेच त्यांनी सर्व राजकीय पक्षांना राजकारण न करण्याचे आवाहन देखील केले आहे. मला वाटतं यात आणखी काही नवीन गोष्टी बोलायची गरज नाही. मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळीही अशीच घटना घडली होती.

परंतु या घटनेवरून ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी ते करावं, कारण फडणवीस यांनी काल घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrasekhar Bawankule
CoWIN Data Leak: 'कोविन पोर्टल'वरून कोट्यवधी नागरिकांचा डेटा लीक? केंद्र सरकार करणार चौकशी

"तेव्हा यापेक्षा भयंकर घटना घडली होती"

बावनकुळे म्हणाले की, अजित दादा आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षाही भयंकर घटना घडली होती. त्या ठिकाणी पुन्हा काही होऊ नये म्हणून काही सूचना आणि व्यवस्था उभ्या केल्या. राष्ट्रवादीमध्ये आता नवनवीन लोकं तयार झाले आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे ते उत्साहात आहेत. हा राजकारणाचा विषय नाही, असे बावनकुळे म्हणाले. (Latest Political News)

Chandrasekhar Bawankule
Maharashtra Sadan Scam Case: छगन भुजबळांच्या याचिकेवरून मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी, कोर्टात नेमकं काय घडलं?

कल्याणच्या जागेविषयी काय म्हणाले...

कल्याण लोकसभेच्या जागेवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, कुठल्याही जागेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डला आहे. त्यामुळे उत्साहाच्या भरात त्यांच्याकडचं (शिंदे गट) किंवा आमच्याकडचं कोणी काही बोललं असेल तर त्याला महत्त्व नाही. पार्लमेंटरी बोर्डाच जागावाटप होईल. जागा वाटपाचा अधिकार हा राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com