CoWIN Data Leak: 'कोविन पोर्टल'वरून कोट्यवधी नागरिकांचा डेटा लीक? केंद्र सरकार करणार चौकशी

Data Leak News: 'कोविन पोर्टल'वरून कोट्यवधी नागरिकांचा डेटा लीक? केंद्र सरकार करणार चौकशी
CoWIN Data Leak
CoWIN Data LeakSaam Tv
Published On

CoWIN Data Leak: देशातील नागरिकांच्या वैयक्तिक माहिती संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीत दावा करण्यात आला आहे की, कोविन पोर्टलवरून नागरिकांची वैयक्तिक माहिती असलेला डेटा लीक झाला आहे. हा डेटा टेलिग्रामवर लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे. ट्विटरवरील काही युजर्सनी दावा केला आहे की, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक आहे.

सरकार करणार चौकशी

आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. कथितपणे लीक झालेला डेटा कोविन कडून आला आहे की, इतर कुठल्यातरी स्रोतातून लीक झाला आहे? याची चौकशी सरकार करेल.

CoWIN Data Leak
Chor Bazaar: चोर बाजार फिरण्यासाठी आलेल्या परदेशी युट्युबरवर हल्ला, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

वृत्तानुसार, जेव्हा कोविन पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टेलिग्राम बॉटवर टाकला जातो, तेव्हा लिंग, डीओबी आणि लसीकरण केंद्राचे नाव आणि त्याचा डोस यासह लसीकरणासाठी वापरलेला ओळखपत्र क्रमांक उघड होतो. या डेटा लीकमुळे टेलीग्रामवर कोणीही भारतीय नागरिकांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट क्रमांक पाहू शकतो. (Latest Marathi News)

तृणमूल काँग्रेसनेही केला डेटा लिकचा आरोप

तृणमूल काँग्रेसचे (TMC) प्रवक्ते साकेत गोखले यांनीही कोविनचा डेटा लीक झाल्याचा आरोप केला आहे. त्यांन ट्विटरवर लीकशी संबंधित स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. यामध्ये माजी गृह आणि अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासह अनेक राजकारणी आणि पत्रकारांचा डेटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

CoWIN Data Leak
Share Market: एक लाखाची गुंतवणूक झाली 40 लाख, 8 रुपयांचा शेअरमध्ये जबरदस्त वाढ

मल्याळम डेलीच्या वृत्तानुसार, लीक झालेल्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांचाही समावेश आहे. आधार क्रमांक आणि डीओबीच्या शेवटच्या चार अक्षरांसह त्यांचा क्रमांक टाकला असता, उत्तराखंडमधील कोटद्वार येथील आमदार रितू खंडुरी भूषण यांची पत्नी रितू खंडुरी भूषण यांची वयक्तीक माहितीही समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com