Share Market: एक लाखाची गुंतवणूक झाली 40 लाख, 8 रुपयांचा शेअरमध्ये जबरदस्त वाढ

एक लाखाची गुंतवणूक झाली 40 लाख, 8 रुपयांचा शेअरमध्ये जबरदस्त वाढ
Multibagger Stock
Multibagger StockSaam Tv
Published On

Multibagger Stock: अनेकजण म्हणतात शेअर मार्केट (Share Market) म्हणजे नशिबाचा खेळ, मात्र हे खरं नसून शेअर मार्केट हा अचूक हिशोबाचा खेळ आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मात्र तुमचा निर्णय चुकला तर मोठं नुकसान ही होऊ शकतं. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला चांगला नफा मिळवायचा असेल तर योग्य शेअर्स निवडा आणि ते दीर्घकाळ धरून ठेवा.

यामध्ये असाच एक शेअर आहे, ज्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यात ज्यांनी १ लाखांची गुंतवणूक केली होती, त्याचं रूपांतर आता ४० लाख रुपयांमध्ये झालं आहे. या शेअरचं नाव आहे मान अॅल्युमिनियम (Maan Aluminium).

Multibagger Stock
Success Story: हॉटेलमध्ये करायची वेटरचं काम, आज चालवतेय 2 लाख कोटींची कंपनी; कोण आहेत यामिनी रंगन?

बोनसची घोषणा

आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा देणाऱ्या मान अॅल्युमिनियमने बोनस शेअर जारी करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय कंपनी १:२ च्या प्रमाणात शेअर्स विभाजित करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बोर्डाने पात्र शेअर्सधारकांना १:१ च्या प्रमाणात बोनस देण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने १० रुपये दर्शनी मूल्याचा एक शेअर प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्याच्या दोन शेअर्समध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठीची रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते. (Latest Marathi News)

४,००० टक्क्यांहून अधिक परतावा

मान अॅल्युमिनियमने गेल्या सात वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ४,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी २४ जून २०१६ रोजी बीएसईवर मान अॅल्युमिनियमचे शेअर्स 7.83 रुपयांच्या पातळीवर होते. आज एका शेअरची किंमत 322.90 रुपयांवर पोहोचली आहे. अशाप्रकारे गेल्या सात वर्षांत मान अॅल्युमिनियमच्या शेअरच्या किमतीत ४०२३.८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Multibagger Stock
Congress State President Change : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार? प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता; कुणाची नावं चर्चेत?

एक लाखाची गुंतवणूक ४० लाखांहून अधिक झाली

जर एखाद्या गुंतवणूकदाराने सात वर्षांपूर्वी मान अॅल्युमिनियमच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि ते टिकवून ठेवले असते, तर आज १ लाख रुपये ४१ लाखांपेक्षा जास्त झाले असतील. अलिकडच्या काळात शेअरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, गेल्या पाच दिवसांत हा शेअर ३६.५८ टक्क्यांनी वाढला आहे.

तसेच गेल्या एका महिन्यात हा शेअर ७३.६६ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत मान अॅल्युमिनियमचे शेअर्स ८१.४६ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअरने १८१.९७ टक्क्यांनी झेप घेतली आहे. शुक्रवारी मान अॅल्युमिनियमचे शेअर्स बीएसईवर १.६० टक्क्यांनी वाढून ३२२.९० रुपयांवर बंद झाले.

(टीप: कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com