Success Story: हॉटेलमध्ये करायची वेटरचं काम, आज चालवतेय 2 लाख कोटींची कंपनी; कोण आहेत यामिनी रंगन?

Inspiring Success Stories: हॉटेलमध्ये करायची वेटरचं काम, आज चालवतेय 2 लाख कोटींची कंपनी; कोण आहेत यामिनी रंगन?
Yamini Rangan Success Story
Yamini Rangan Success StorySaam Tv
Published On

Inspiring Success Stories: भारतात असे अनेक लोक आहेत जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात, मात्र ते पूर्ण करण्यासाठी नेमकं काय करावं हे त्यांना माहित नसतं. मात्र आज आपण जिच्याबद्दल जाणून घेणार आहोत, तिने फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर ते पूर्ण ही केलं. भारताच्या अगदी लहान शहरातील या मुलीने चक्क अमिरिकेत आपलं मोठं साम्राज्य उभं केलं आहे.

साम्राज्य तेही असं तसं नाही तर तब्बल 2 लाख कोटींचं. आपण जिच्याबद्दल बोलत आहोत तीच नाव आहे यामिनी रंगन (Yamini Rangan Salary). आज तंत्रज्ञान जगतातील सर्वात प्रतिष्ठित सीईओपैकी एक असलेल्या यामिनी रंगन (Yamini Rangan Age) हिच्या यशस्वी प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Yamini Rangan Success Story
Fake News Fact Check: राज ठाकरेही पडले फेक न्यूजला बळी? भर सभेत दिली चुकीची माहिती

यामिनी रंगन सध्या अमेरिकेत स्थायी असून तिथे ती 25.66 अब्ज डॉलर्स 2 लाख कोटींपेक्षा जास्त नेटवर्थ असलेल्या कंपनीचं नेतृत्व करत आहे. ती आपल्या वयाच्या 21 व्या वर्षी अमेरिकेत गेली. यामिनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात संघर्षाचा सामना करावा लागला. महिनाभर अमेरिकेत राहण्याचा प्रयत्न करत असताना यामिनीने घरचे भाडे भरल्यानंतर तिच्याकडे फक्त 150 डॉलर्स शिल्लक राहत होते. अशा परिस्थितीत तिला कामाची गरज होती. (Latest Marathi News)

'डीएनए'च्या वृत्तानुसार, यामिनीने तिची पहिली नोकरी अटलांटामधील फुटबॉल स्टेडियममध्ये केली. जिथे तिने रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. यामिनीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला नेहमीच एकटीला वेगळं राहायचं होतं आणि तिला घरी परत जायचे नव्हते. तसेच तिला तिच्या पालकांकडून पैसेही मागायचे नव्हते.

Yamini Rangan Success Story
Amravati-Chikhali National Highway: गुजरातसह 'चार' राज्यांना जोडणार बुलढाणा महामार्ग, गडकरींनी केलं 816 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन

अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये केलं काम

यामिनी रंगनने भरथियार युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर येथून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यापूर्वी बर्कले येथून एमबीए केले. पुढे तिने SAP, Lucent, Workday आणि Dropbox सारख्या IT दिग्गजांसाठी काम केलं. 2020 मध्ये ती HubSpot मध्ये Chief Customer Executive म्हणून रुजू झाली.

पुढे एका वर्षाच्या आत तिला 2021 मध्ये CEO पदावर पदोन्नती मिळाली आणि यामिनी रंगन ओरावलेच्या सफारा कॅटझ, अरिस्ताच्या जयश्री उल्लाल आणि HCL च्या रोशनी नाडर सारख्या यशस्वी महिला CEO च्या यादीत सामील झाल्या. तिने 2019 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील व्यवसायातील सर्वात प्रभावशाली महिला यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com