Fake News Fact Check: राज ठाकरेही पडले फेक न्यूजला बळी? भर सभेत दिली चुकीची माहिती

राज ठाकरेही पडले फेक न्यूजला बळी? भर सभेत दिली चुकीची माहिती
Raj Thackeray Fake News
Raj Thackeray Fake NewsSaam Tv
Published On

>> तुषार ओव्हाळ

Fake News Fact Check: देशभरात सध्या सोशल मिडियावर फेक न्युजचा मोठा सुळसुळाट आहे. सामान्य जनतेपासून ते मोठ मोठे नेते फेक न्यूजला बळी पडले आहेत. आता राज ठाकरेही अशाच एका फेक न्युजला बळी पडलेले आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

साधन सुविधा विभागाचा वर्धापनदिन निमित्त आज राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे बोलायला लागले की कार्यकर्ते तल्लीन होऊन जातात. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी परदेशातील आपात्कालीन सेवेचं कौतुक केलं आणि भारतातील आपात्कालीन सेवेवर बोट ठेवलं आहे.

भारतातील आपात्कालीन सेवेवर टीका करताना राज ठाकरे यांनी चुकीचा संदर्भ सांगितला. राज ठाकरेंनी ज्या हेअरड्रायरचा उल्लेख केला. तो हेअरड्रयायर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वापरलाच गेला नव्हता. (Latest Marathi News)

Raj Thackeray Fake News
Amravati-Chikhali National Highway: गुजरातसह 'चार' राज्यांना जोडणार बुलढाणा महामार्ग, गडकरींनी केलं 816 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 28 मे रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरूद्ध गुजरात टायटन्स मॅच होणार होती. पण पावसामुळे ही मॅच दुसऱ्या दिवशी ढकलली. पण 29 मॅचलाही पाऊस पडला आणि मॅचचा खेळखंडोबा झाला. तेव्हा सोशल मिडियावर या स्टेडियमच्या पायाभूत सुविधांचे वाभाडे काढण्यात आले. अनेकांनी तो हेअरड्रायरचा फोटा व्हायरल केला. पण हा फोटो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचा नव्हताच. तो फोटो होता आसामच्या गुवाहाटीचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी 2020 रोजी गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंकेचा टी 20 सामना रंगणार होता. पण पावसाने हजेरी लावली. पाऊस गेल्यानंतर स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी ग्राउंड सुकवायला घेतलं. पण जमीन इतकी ओली झाली होती की काही केल्या ती वाळत नव्हती. कर्मचाऱ्यांनी हेअर ड्रायरही वापरला. पण परिणाम शून्य. अखेर ही मॅच रद्द झाली.

Raj Thackeray Fake News
Ajit Pawar News: आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक; अजित पवारांनी शिंदे सरकारला सुनावलं

पण हे हेअरड्रायर प्रकरण चांगलच तापलं. जगातल्या सर्वात श्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या BCCI ला हेअरड्रायर वापरावे लागतात. ही फारच लाजिरवाणं होतं, असं म्हणात नेटकऱ्यांनी फटकारलं होतं.

पण मुद्दा असाय की फेक न्युज आपल्यात किती झिरपलीये. राज ठाकरे यांनी केलेली टीका चुकीची नाही. पाऊस पडल्यानंतर जमीन सुकवण्यासाठी हेअरड्राय वापरावा लागला, ही घटना भारतातलीच आहे.फक्त ही घटना अहमदाबादची नसून गुवाहाटीची आहे. दरम्यान, राज ठाकरेंना गेल्या काही वर्षात फार राजकीय यश मिळालं नाही. तरी आजही त्यांना ऐकणारा मोठा जनसमुदाय आहे. म्हणून राज ठाकरेंनी स्टेटमेंट करताना एकदा तरी Fact check करायला हवा होतं, असं मत सामान्यांनी व्यक्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com