Congress State President Change : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार? प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता; कुणाची नावं चर्चेत?

Political news : विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
Congress nana patole
Congress nana patoleSaam TV
Published On

Mumbai News : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. सर्वच पक्ष आपली ताकड वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर पक्षातही अंतर्गत बदल करताना दिसत आहेत. आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यपदावरून हटवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न होत असल्याचं दिसून आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पाटील या दोन दिवसांच्या दौऱ्यात राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Congress nana patole
MNS Leader Vasant More : मनसेच्या वसंत मोरेंना का वाटतेय ईडीची भीती? फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं...

मराठा किंवा ओबीसी नेत्याचा प्रदेशाध्यक्ष पद मिळणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचा विचार करताना जातीय समीकरण देखील लक्षात घेतलं जाऊ शकते. दलीत चेहरा मुंबई काँग्रेससाठी दिल्याने आता मराठा किंवा ओबीसी नेत्याचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचार केला जाऊ शकतो. (Political News)

पक्षातील गटबाजी थांबवू शकेल असा नेता

काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा नेत्याची गरज आहे जो आगामी निवडणुकीत यशस्वी काम करुन दाखवेल. तसेच पक्षातील गटबाजी थांबवू शकेल अशा नेत्याची काँग्रेसला सध्या गरज आहे. याशिवाय सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणे, महविकास आघाडी होत असल्याने देश पातळीवर विरोधक एकत्र येत असताना राज्यातही ते समन्वय ठेवणारा नेता काँग्रेसला प्रदेशाध्यपदी हवा आहे.

Congress nana patole
Abdul Sattar News: कृषिमंत्री अब्दुल यांच्या पीएबाबत संभ्रम कायम; अकोला धाडसत्रातील 'तो' नेमका कोण?

प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेतील नावं

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशोक चव्हाण, सुनील केदार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com