Akola News Today: अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या धाडीसत्रात खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आले होते. यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारणा केली असता त्यांनी काढता पाय घेतला. (Latest Marathi News)
तसेच त्यांनी या धाडी मीच टाकण्यास सांगितले असल्याचे कबूल केले. या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काही खासगी व्यक्ती तथा कृषी मंत्री यांच्या जवळचे काही लोक असल्याचा प्रश्न विचारला असता अब्दुल सत्तर (Abdul Sattar) म्हणाले की, दिपक गवळी हा माझा पीए नाही तर कृषी अधिकारी आहे. तो या युनिटमध्ये सहभागी आहे. ६२ अधिकारी या युनिटमध्ये होते. ५० वर्षांतील पहिली कारवाई आहे. माझा पीए हा कुलकर्णी असून ते मुंबईत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सत्तारांच्या शासकीय दौऱ्यातील पत्रात गवळींचा 'स्वीय सहायक' असा उल्लेख आहे.
अकोल्यातील धाडींचं प्रकरण नेमकं काय?
अकोल्यातील एमआयडीसीमध्ये कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं धाडी धाडी टाकल्या होत्या. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे.
या पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा पीए दिपक गवळी देखील असल्याचं उघड झालं आहे. या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केला आहे. दरम्यान, यावरून आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला आहे.
पथकातील खासगी व्यक्तिकडून थेट गाेदामात जात साहित्याची नासधूस केल्याचा आरोप व्यावसाियक व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांनी थेट कृषी कार्यालयात धाव घेतली. त्यांनी अधिकारी यांना निवेदन दिले. दरम्यान यासंदर्भात आमदार मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.