'मोठी घोषणा',अमोल कोल्हेंच्या पोस्टने खळबळ; राजकारण की नवी मालिका?

Amol Kolhe Big Announcement Political Or Serial: अमोल कोल्हे यांच्या “मोठी घोषणा करणार…” या पोस्टमुळे राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. ही घोषणा राजकारणाशी संबंधित आहे की नव्या मालिकेबाबत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Amol Kolhe’s teaser post about a “big announcement” fuels curiosity across political and entertainment circles.
Amol Kolhe’s teaser post about a “big announcement” fuels curiosity across political and entertainment circles.saam tv
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इन्फ्रामॅन अशी उपमा देत कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच सत्ताधाऱ्यांकडून ऑफर आल्यास विचार करू असे विधान केल्याने ऑपरेशन तुतारीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण शरद पवार यांच्यासोबत सांगून ह्या चर्चाना पूर्णविराम लावला होता. अशातच आज त्यांनी एक पोस्ट करत त्यांच्या मनात नेमके चालले काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Amol Kolhe’s teaser post about a “big announcement” fuels curiosity across political and entertainment circles.
Mumbai Tree Fall: पावसाचा कहर की महापालिकेचा निष्काळजीपणा? २४ तासांत १९ झाडे-फांद्या कोसळल्या

पुणे जिल्ह्यातील शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा करणार अशी पोस्ट शेअर करताच राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क रंगत असतानाच, आता ही घोषणा नेमकी राजकारणाशी संबंधित असेल की त्यांच्या नव्या ऐतिहासिक मालिकेबाबत, याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Amol Kolhe’s teaser post about a “big announcement” fuels curiosity across political and entertainment circles.
खरा अराजकतेचा चेहरा उघडा पडला; मुख्यमंत्र्यांची CJP आंदोलनावर टीका|VIDEO

गेल्या दोन दिवसांत डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यानंतर ते महायुतीत जाणार का, अशा चर्चांना वेग आला होता. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपण शरद पवार यांच्या नेतृत्वासोबतच ठामपणे असल्याचं स्पष्ट करत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर आता “मोठी घोषणा करणार…” अशी सोशल मीडिया पोस्ट समोर आल्याने पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, अभिनय क्षेत्रातही सक्रिय असलेल्या अमोल कोल्हेंची एखादी नवी ऐतिहासिक मालिका किंवा कलाकृती जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही घोषणा राजकीय आहे की मनोरंजन क्षेत्राशी संबंधित, याचा उलगडा त्यांच्या अधिकृत घोषणेनंतरच होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com