Mumbai Tree Fall: पावसाचा कहर की महापालिकेचा निष्काळजीपणा? २४ तासांत १९ झाडे-फांद्या कोसळल्या

Tree Collapse Incidents In Mumbai Due To Heavy Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे २४ तासांत १९ ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या. सांताक्रूझमध्ये झाड पडून ८ जण जखमी झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
A fallen tree in Santacruz injures eight people amid rising tree collapse incidents during heavy rains in Mumbai.
A fallen tree in Santacruz injures eight people amid rising tree collapse incidents during heavy rains in Mumbai.ai image
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुसळधार पावसामुळे मुंबईत वृक्ष कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी दुपारी सांताक्रूझ येथील रेहेजा महाविद्यालयाजवळ खासगी इमारतीच्या आवारातील एक मोठे झाड अचानक कोसळल्याने आठ जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

A fallen tree in Santacruz injures eight people amid rising tree collapse incidents during heavy rains in Mumbai.
खरा अराजकतेचा चेहरा उघडा पडला; मुख्यमंत्र्यांची CJP आंदोलनावर टीका|VIDEO

महापालिकेला खासगी इमारतीच्या आवारातील झाड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. त्याचवेळी परिसरातील आणखी एक झाड अचानक कोसळल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेतही काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.

A fallen tree in Santacruz injures eight people amid rising tree collapse incidents during heavy rains in Mumbai.
Rain Alert india : पुढील २ दिवस सतर्क राहा! १७ राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट, गारपीटीचा तडाखाही बसणार

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २ जुलै सकाळी ८ ते ३ जुलै सकाळी ८ या २४ तासांत मुंबईत झाडे व फांद्या पडण्याच्या एकूण १९ घटना घडल्या. तसेच गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर व उपनगरात आणखी ११ ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या.

A fallen tree in Santacruz injures eight people amid rising tree collapse incidents during heavy rains in Mumbai.
Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशा घटना घडत असल्याने मुंबईकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. धोकादायक वृक्षांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com