Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

महाड

महाड हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील येते. पावसाळ्यात येथे पर्यटक गर्दी करतात. महाड रायगड किल्ला आणि सावित्री नदीसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून सुमारे १६० किमी आणि पुण्यापासून १३५ किमी अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे.

Mahad | google

रायगड किल्ला

महाडपासून सुमारे 25 किमी अंतरावर रायगड हा डोंगरी किल्ला वसलेला आहे. किल्ल्यावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा महत्त्वाचा किल्ला आहे.

Raigad Fort | google

गांधारपाले लेणी

गांधारपाले लेणी ही पांडवलेणी म्हणूनही ओळखल्या जातात. या प्राचीन दगडी बुध्द लेणी महाडजवळच आहेत. मुलांसोबत वन डे ट्रिपसाठी हे लोकेशन सुंदर आहे.

Gandharpala Caves | google

कुंडलिका नदी

कुंडलिका नदी व्हाईटवॉटर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील नसर्ग जणू स्वर्गच वाटतो. येथे तुम्ही फोटोशूटचा आनंद देखील घेऊ शकता.

Kundalika River | google

वरंधा घाट

वरंधा घाट हा कोकण प्रदेशाला पुणे जिल्ह्याला जोडणारा पर्वतीय खिंड आहे. पावसाळ्याच्या महिन्यांत येथे धबधब्यांचा सुरेख नजारा पाहायला मिळतो.

Varandha Ghat | google

कोलाड

कोलाड येथे देवकुंड धबधबा, सुकेली धबधबा आणि ताम्हिणी धबधबा आहे. येथे तुम्ही पावसाळ्यात मित्रांसोबत वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Kolad | google

देवकुंड धबधबा

भीरा गावाजवळ देवकुंड धबधबा आहे. घनदाट, हिरव्यागार जंगलातून मध्यम स्वरूपाचा ट्रेक करावा लागतो. एका चित्तथरारक, जोरदार धबधब्याच्या पाण्याने भरलेले नैसर्गिक तलाव तुम्हाला येथे आहे.

Devkund Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Pune Fort | saam tv
येथे क्लिक करा...