Shreya Maskar
हडसर किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला आहे. सातवाहन काळातील एकाच अखंड पाषाणात कोरलेले प्रवेशद्वार आणि रोमांचक रॉक-क्लांबिंग मार्गांसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे.
हडसर किल्ल्याला 'पर्वतगड' म्हणूनही ओळखले जाते. हडसर किल्ला रोमांचक ट्रेकिंगसाठी ओळखला जातो. मराठा व सातवाहन काळातील समृद्ध इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.
हडसर किल्ला ३,२६५ फूट उंचीवर वसलेला आहे. प्रामुख्याने मराठा साम्राज्याचा विस्तार करताना झालेली प्रदेशांची देवाणघेवाण आणि त्यानंतरच्या विजयांमुळे हडसर किल्ल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांशी खास कनेक्शन आहे.
महाराष्ट्रातील जुन्नर भागात असलेला हडसर किल्ला एका नैसर्गिक त्रिकोणी आकाराच्या टेकडीवर वसलेला आहे.
सातवाहन काळातील हा किल्ला नाणेघाटातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करत असे. या किल्ल्याची मालकी अनेकदा बदलली. शहाजी राजे आणि मुघल यांच्यातील करारांमध्ये याचा उल्लेख आढळतो आणि पुढे १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला.
किल्ल्याच्या माथ्यावर महादेव मंदिर , प्राचीन पाण्याची टाके आणि एक मोठे नैसर्गिक तळे आहे. ट्रेकिंगसाठी ‘खुंटीची वाट’ हा मार्ग अत्यंत लोकप्रिय आहे.
हडसर किल्ल्याजवळ कल्याण स्टेशन आहे. कल्याणहून जुन्नरला जाण्यासाठी एसटी बस पकडा. जुन्नरमधून राजूर, निमगिरी किंवा केवाडा या दिशेने जाणारी स्थानिक बस पकडा आणि हडसरच्या पायथ्याच्या गावात उतरा.पायथ्याच्या गावापासून गडाच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन तास लागतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.