Shreya Maskar
महाबळेश्वरला अनेक व्ह्यू-पॉइंट्स आहेत. जिथून पश्चिम घाट, दऱ्या आणि नद्यांचे विहंगम दृश्य अनुभवता येते. महाबळेश्वर हे ठिकाण हनिमूनसाठीही बेस्ट आहे.
वेण्णा तलाव महाबळेश्वरच्या मध्यभागी वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे बोटिंगचा आनंद घेता येतो. येथे रो-बोट्स आणि पेडल बोटींची सुविधा उपलब्ध आहे.
वेण्णा तलावाच्या परिसरात घोड्यावरून फिरता येते. तसेच आजूबाजूला खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे. येथून सूर्यास्तचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वेण्णा तलाव हा मानवनिर्मित तलाव आहे. हा २८ एकरचा मानवनिर्मित तलाव असून १८४२ मध्ये बांधण्यात आला.
बोटिंग करताना पश्चिम घाटाच्या घनदाट, हिरव्यागार वनराईचा सुंदर नजारा दिसतो. तसेच तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता. संध्याकाळी येथे थंड हवा अनुभवता येते.
वेण्णा तलाव पाहायला गेल्यावर तेथील स्ट्रीट फूड खायला अजिबात विसरू नका. भेळपुरी, पावभाजी, चणाचाट, चटपटीत मका येथे खायला मिळतो.
महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे येथे स्ट्रॉबेरी नक्की खा. त्यासोबत टूटी फ्रूटी आणि गाजरही येथे मिळता. वीकेंडला फॅमिली ट्रिपसाठी हे भन्नाट लोकेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.