Dahisar Tourism : दहिसरजवळील ५ 'सीक्रेट' पिकनिक स्पॉट्स, वीकेंड होईल एकदम खास

Shreya Maskar

दहिसर

दहिसर हे मुंबईच्या अगदी उत्तरेकडील उपनगर असून येथे अनेक सुंदर पिकनिक स्पॉट्स आहेत. तसेच येथे गेल्यावर 'स्ट्रीट फूड' आवर्जून खा. दहिसरजवळील पर्यटन स्थळांची यादी पाहा.

Dahisar | google

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

दहिसरच्या अगदी जवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. येथे सायकलिंग, बोटिंग, ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. उद्यानाच्या प्राचीन कान्हेरी गुहा देखील आहे.

Sanjay Gandhi National Park | google

पाली बीच

उत्तन, भाईंदर येथे पाली बीच आहे. वीकेंडला येथे गर्दी पाहायला मिळते. तुम्ही येथे बोटिंग करू शकता. तसेच मित्रांसोबत फिरायला ही जागा बेस्ट आहे.

Pali Beach | pinterest

गोराई बीच

बोरीवली किंवा मार्वे जेटीवरून फेरीने (बोटीने) गोराई बीचला सहज पोहोचता येते. हा एक शांत समुद्रकिनारा आहे. येथे तुम्हाला घोडेस्वारी करता येईल. तसेच येथील खाद्यपदार्थ देखील चविष्ट आहेत.

Gorai Beach | pinterest

ग्लोबल विपश्यना पॅगोडा

गोराई बीचजवळच ग्लोबल विपश्यना पॅगोडा आहे. येथे वास्तुकलेचा एक अद्भुत नजारा पाहायला मिळतो. फॅमिली पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Global Vipassana Pagoda | google

मंडपेश्वर गुहा

दहिसर पश्चिम भागात ८ व्या शतकातील खडकात कोरलेल्या मंडपेश्वर गुहाआहेत, ज्या भगवान शिवाला समर्पित आहेत. लहान मुलांना हे ठिकाण नक्की दाखवा.

Mandapeshwar Cave | google

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य

वसईमध्ये, दहिसरपासून सुमारे १५-२० किमी अंतरावर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. येथे ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. तसेच धबधब्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Tungareshwar Wildlife Sanctuary | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : सोलापूरच्या किल्ल्याला 'भुईकोट' नाव कसं पडलं? 'हे' आहे रंजक कारण

Solapur Bhuikot Fort | saam tv
येथे क्लिक करा...