Shreya Maskar
भुईकोट किल्ल्याला सोलापूर किल्ला असेही म्हणतात. हा महाराष्ट्रातील सोलापूर शहरात, सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला एक प्राचीन मध्ययुगीन भू-दुर्ग (जमिनीवरील किल्ला) आहे.
मध्ययुगीन काळात लष्करी संरक्षणाच्या दृष्टीने एक मजबूत तटबंदी म्हणून सोलापूर भुईकोट किल्ला उभारण्यात आला होता. सोलापूरला गेल्यावर या ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या.
'भुईकोट' हे नाव मराठी भाषेतून आले आहे. यात 'भुई' म्हणजे जमीन आणि 'कोट' म्हणजे किल्ला.
भारतातील बहुतेक ऐतिहासिक किल्ले हे पर्वत, टेकड्यांच्या माथ्यावर बांधले गेले होते, परंतु हा किल्ला सपाट आणि मोकळ्या जमिनीवर बांधला गेला; म्हणूनच याला 'भुईकोट' असे नाव पडले.
इतिहासकारांच्या मते, सोलापूर भुईकोट किल्ला १४ व्या शतकात बहमनी राजवटीच्या काळात बांधला गेला असावा. हा किल्ला मध्ययुगीन काळात बहमनी राजघराण्याने बांधला होता.
मुंबईहून सोलापूरपर्यंत ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर सोलापूर स्टेशनला उतरल्यावर रिक्षा किंवा एसटीने किल्ल्यापर्यंत पोहचा.
श्री सिद्धरामेश्वर मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, प्राचीन वाडे व मंदिरे या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.