Shreya Maskar
दूधसागर धबधबा गोवा-कर्नाटक सीमेजवळील भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यात वसलेला आहे. पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
दूधसागर धबधब्याजवळ 'कुलेम' हे गाव आहे. धबधब्याकडे जाण्यासाठी तुम्ही जीप सफारीचा वापर करू शकता.
दूधसागर धबधबा त्याच्या विलोभनीय, दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र रुपासाठी प्रसिद्ध आहे.पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य परिसराचे सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
दूधसागर धबधब्याला 'दुधाचा समुद्र' (Sea of Milk) असेही म्हणतात. पावसाळ्यात धुक्यामध्ये हरवलेला हा फेसाळालेला धबधबा स्वर्गाहून सुंदर दिसतो.
दूधसागर धबधब्याची उंची अंदाजे 310 मीटर (1017 फूट) आहे. मांडोवी नदीवरील या नेत्रदीपक चार-स्तरीय धबधब्याचा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे.
मुंबईहून (दादर, सीएसएमटी, किंवा ठाणे) ते गोव्यातील मडगाव जंक्शन पर्यंत ट्रेनने प्रवास करा.मडगावपासून, कुलेम (सुमारे 30 किमी दूर) पर्यंत कनेक्टिंग पॅसेंजर ट्रेन किंवा टॅक्सी पकडा.कुलेमपासून फॉल्सच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वन विभागाची अधिकृत जीप सफारी करा.
निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करायचा असेल तर दूधसागर धबधब्याला आयुष्यात एकदा तरी भेट द्या. तुम्हाला येथे पावसाळ्यात इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.