Vasai-Virar Waterfall : वीकेंडचा प्लान ठरला! हिरव्यागार जंगलात लपलाय धबधबा, वसई-विरारजवळील बेस्ट पिकनिक स्पॉट

Shreya Maskar

वसई-विरार

चिंचोटी धबधबा हा विरारपासून साधारण २०-२५ किमी अंतरावर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात लपलेला १०० फूट उंचीचा निसर्गरम्य धबधबा आहे.

Vasai | google

जंगल ट्रेक

चिंचोटी धबधबा जाण्यासाठी जंगल ट्रेक करावा लागतो. पायथ्याच्या गावापासून धबधब्यापर्यंत पोहोचण्यास साधारणपणे दीड ते दोन तास लागतात.

Jungle Trek | pinterest

कसं जाल?

चिंचोटी धबधब्याकडे जाण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड स्टेशनला उतरा. तेथून कामण गाव किंवा चिंचोटी फाट्यापर्यंत जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा पकडा.

How to Get There? | google

वन डे ट्रिप

पावसाळ्यात येथे मित्रांसोबत वन डे ट्रिप प्लान करू शकता. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करा. तसेच धबधब्याच्या पाण्यात मनसोक्त भिजा. मुंबईजवळील हे छान लोकेशन आहे. वसई-विरारजवळ अनेक सुंदर धबधबे आहेत.

One-Day Trip | pinterest

बोकडकडा धबधबा

बोकडकडा धबधबा वज्रेश्वरी/भिवंडी परिसराजवळील महालुंगे गावात वसलेला आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग करून जाऊ शकता. पावसाळ्यात येथील निसर्ग बहरतो.

Bokadkada Waterfall | google

उसगाव धबधबा

उसगाव धबधबा पालघर/वसई भागातील उसगाव गावाजवळ आहे. हा धबधबा खूप कमी लोकांना माहितेय. शांत प्रवाहासाठी आणि हिरव्यागार परिसरासाठी हा धबधबा ओळखला जातो.

Usgaon Waterfall | google

तांदुळवाडी धबधबा

तांदुळवाडी धबधब्याला 'लालठाणे धबधबा' असेही म्हणतात. हा पालघर जिल्ह्यातील सफाळे गावाजवळ आणि वसईपासून सुमारे ४६ किमी अंतरावर स्थित आहे. तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे एक अतिशय सुंदर पावसाळी पर्यटन स्थळ आहे.

Tandulwadi Waterfall | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google pin

NEXT : पावसाळ्यात पार्टनरसोबत 'हे' हिल स्टेशन फिरा, सुंदर निसर्गाच्या प्रेमातच पडाल

Nashik Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...