Shreya Maskar
नाशिकच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुंदर कोरोली हिल स्टेशन लपलेले आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलते. वीकेंडला तुम्ही येथे जोडीदारासोबत नक्कीच ट्रिप प्लान करा.
कोरोली हिल स्टेशन ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. हायकिंगचा येथे भन्नाट आनंद घेता येतो. हिरव्यागार घनदाट जंगलाने वेढलेले हे हिल स्टेशन पाहायला परदेशी पर्यटकही गर्दी करतात.
जर तुमचा जोडीदार निसर्ग प्रेमी असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. येथे तुम्हाला जवळून पक्षीनिरीक्षण करता येईल. तसेच हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील उत्तम आहे.
कोरोली हिल स्टेशनजवळ वैतरणा जलाशय, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर आणि ब्रह्मगिरी टेकडी ही पर्यटन स्थळे आहेत.
कोरोली हिल स्टेशनच्या आजूबाजूला राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. आलिशान व्हिला, रिसॉर्ट्स आहेत. तुम्हाला येथे आल्यावर आठवड्याभराचा ताण निघून जाईल, तुम्ही फ्रेश फिल कराल.
कोरोली हिल स्टेशनच्या माथ्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. कोरोली हिल स्टेशनला बोटिंग, घोडेस्वारी यांचा आनंद घेता येतो.
येथील वैतरणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोटिंगची उत्तम सोय आहे. सभोवतालच्या हिरव्या टेकड्या आणि शांत पाण्यात बोटिंग करण्याचा अनुभव खूप छान असतो.
मुंबईहून ट्रेनने नाशिक रेल्वे स्टेशनला उतरून पुढे तुम्ही रिक्षा , बसने कोरोली हिल स्टेशनला पोहचाल. पावसाळ्यात येथे आवर्जून जावे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.