Rajapur Tourism : वीकेंडला 'राजापूर'ला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' १० ठिकाणं पाहायला अजिबात विसरू नका

Shreya Maskar

राजापूर

राजापूर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे, जे अल्फोन्सो (हापूस) आंबे, प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिकरम्य ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे.

Rajapur

राजापूरची गंगा

'राजापूरची गंगा' हा एक पवित्र जलप्रवाह आहे, जो जमिनीतून अनियमित अंतराने (साधारणपणे दर २-३ वर्षांनी) नैसर्गिकरित्या प्रकट होतो. सुमारे तीन महिने प्रवाहित राहतो आणि त्यानंतर पूर्णपणे लुप्त होऊन तो परिसर पुन्हा कोरडा करतो.

Rajapurchi Ganga

सवतकडा धबधबा

सवतकडा धबधबा ज्याला 'चुना कोळवण धबधबा' म्हणूनही ओळखले जाते. हा आपल्या १२५ फूट उंचीच्या, अर्धवर्तुळाकार जलप्रवाहासाठी आणि हिरव्यागार परिसरासाठी ओळखला जातो.

Savatkada Waterfall

खारेपाटण किल्ला

खारेपाटण किल्ल्याला बळीपट्टण म्हणून ओळखला जातो. हा वाघोटन नदीच्या दक्षिण तीरावर एका छोट्या टेकडीवर स्थित आहे. अवशेषांमध्ये बुरुज, एक भूमिगत बोगदा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मंदिर यांचा समावेश आहे.

Kharepatan Fort

उन्हाळे (गरम पाण्याचे कुंड)

कोकण विभागातील 'उन्हाळे' (उन्हावरे/राजापूर) येथील गरम पाण्याचे झरे आहेत. येथे परदेशी पर्यटकही येतात.

Unhale

देवघळी समुद्रकिनारा

देवघळी समुद्रकिनारा कशेळी बीच म्हणूनही ओळखला जातो. तिन्ही बाजूंनी उंच खडकांनी बनवलेला, चंद्रकोराच्या आकाराच्या किनारपट्टीसाठी प्रसिद्ध आहे. अरबी समुद्रावरील शांत सूर्यास्त पाहायला मिळतो.

Devghal

मंदिरे

राजापूरच्या आसपास अनेक मंदिरे आहेत. उदा. धुतपापेश्वर मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री कामदेवी मंदिर, श्री निनादेवी मंदिर, खारेपाटण कालभैरव मंदिर, श्री दत्त मंदिर (कोदवली), कशेळी कनकादित्य मंदिर, श्री महाकाली मंदिर (आडिवरे), श्री दु्र्गा मंदिर (खारेपाटण)

Temples

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note

NEXT : स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाताय? मुंबईहून जाण्यासाठी पाहा एकदम सोप्पा मार्ग

Mumbai To Akkalkot | saam tv
येथे क्लिक करा...